
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदी या मौल्यवान धातुंची किंमत चांगलीच वाढत आहे. आता तर सामान्यांना सोन्याचे दागिने परवडणार की नाही? अशी परिस्थिती झाली आहे. सोन्याच्या भावात सतत वाढ होताना दिसत आहे.

सध्या सणासुदीचा काळ आहे. या काळात लोक सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांत सोन्याचा भाव काय असेल? असे आवर्जुन विचारले जात आहे.

तसं पाहायचं झालं तर गेल्या दिवळीमध्ये सोन्यात गुंतवणूक केलेल्या पैशांचे मूल्य तब्बल 44 टक्क्यांनी वाढले आहे. सप्टेंबर महिन्यात सोन्याचा भाव 10 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात सोनं अशीच झेप घेण्याच शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या पाच ते सहा वर्षात सप्टेंबर महिन्यात सोन्याचा भाव वाढलेलाच आहे. म्हणजेच सप्टेंबर महिन्यात सोन्याचा भाव वाढतो, असे गेल्या काही महिन्यांत पाहायला मिळालेले आहे. ऑक्टोबर महिन्याचीही अशीच स्थिती आहे.

गेल्या पाच ते सहा वर्षांत ऑक्टोबर महिन्यात सोन्याचा भाव वाढल्याचेच पाहायला मिळालेले आहे. सप्टेंबर महिन्यात सोन्याचा भाव सरासरी 2.58 टक्क्यांनी वाढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच ऑक्टोबर महिन्याचे उर्वरित दिवस तसेच पुढच्या काही काळात सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)