Gold Silver Price Today : हात आखडता घेण्याची गरज नाही, सणासुदीआधी सोन्या-चांदीची गुड न्यूज; 10 ग्रॅमचे दर काय ?
Gold Silver Price on 11 September 2026 Latest Updates in Marathi : गणेशोत्सवापूर्वी खरेदीदारांना मोठी गुड न्यूज मिळाली आहे. सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जाणून घ्या आजचे दर

गणेशोत्सव जवळ येताच सर्वत्र सणाची लगबग वाढली आहे. सणासुदीच्या काळात तसेच गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने-चांदी खरेदी करण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो. मात्र, गेल्या काही काळात या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात सातत्याने होत असलेल्या चढ-उतारामुळे अनेक ग्राहकांना खरेदीचा निर्णय घेताना हात आखडता घ्यावा लागत आहे.
अशातच आजचा दिवस सर्वसामान्य ग्राहकांसाठी काहीसा दिलासादायक ठरला आहे. कारण जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 1,500 रुपयांची, तर चांदीच्या दरात 7,000 रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे.
सोन्याच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजच्या घसरणीनंतर जीएसटीसह सोन्याचा दर 1 लाख 55 हजार 530 रुपये इतका झाला आहे.
दुसरीकडे, चांदीच्या दरात सोन्यापेक्षाही मोठी घसरण पाहायला मिळाली. चांदीच्या दरात तब्बल 7 हजार रुपयांची घट झाली असून, जीएसटीसह चांदीचा दर 2 लाख 41 हजार 20 रुपये इतका नोंदवला गेला आहे.
सलगच्या दरवाढीनंतर सोन्या-चांदीच्या दरात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. गणेशोत्सवासह आगामी सण, लग्नसराई आणि गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांचे आता सराफ बाजारातील दरांकडे विशेष लक्ष लागले आहे.
दरात झालेल्या या घसरणीचा फायदा घेत ग्राहक खरेदीकडे वळतात का, तसेच आगामी काळात सोन्या-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होतात का, याकडे आता बाजाराचे लक्ष लागले आहे.