AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुर्देवी क्रिकेटर! सचिनसोबतच केली करिअरला सुरुवात, पण नशिबाने साथ सोडली आणि सगळंच संपलं; कोण आहे हा क्रिकेटर?

अंकोला यांनी 1989 साली पहिल्यांदा भारतीय संघासाटी कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून डेब्यू केला. त्यांचा हा पहिला सामना पाकिस्तानातील कराची येते झाला होता. या सामन्यात त्यांनी दोन गडी बाद केले होते.

दुर्देवी क्रिकेटर! सचिनसोबतच केली करिअरला सुरुवात, पण नशिबाने साथ सोडली आणि सगळंच संपलं; कोण आहे हा क्रिकेटर?
sachin tendulkar and salil ankolaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 11, 2026 | 5:17 PM
Share

Salil Ankola : क्रिकेट हे असं क्षेत्र आहे, जिथे सूर गवसला की खेळाडू यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचतो. तर काही खेळाडू मात्र क्षमता असूनही नशिबाने साथ न दिल्याने कितीही प्रयत्न केला तरीही करिअरमध्ये नाव कमवू शकत नाहीत. क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरला आज संपूर्ण जग ओळखते. परंतु त्याच्यास सोबत क्रिकेटमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केलेले असे काही खेळाडू होऊन गेले, ज्यांनी क्रिकेटचे सामने खेळले. परंतु ते नंतर कुठेही चमकले नाहीत. त्यांना आयुष्यात सचिन एवढी प्रसिद्धी, मान, सन्मान कधीच मिळाला नाही. यापैकीच एक खेळाडू म्हणजे सलिल अंकोला होय.

सचिन तेंडुलकरसोबत केला डेब्यू

सलिल अंकोला हे कधीकाळी भारतीय क्रिकेट संघाचा भाग होते. विशेष म्हणजे 1989 साली अंकोला यांनी सचिन तेंडुलकरसाठीच भारतीय क्रिकेट संघासाठी डेब्यू केलं होतं. सचिन तेंडुलकर पुढे गेला परंतु अंकोला मात्र खास काही करू शकले नाहीत. आजही ते त्यांच्या आयुष्यात झगडत असतात. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळलेलं आहे. ते कधीकाळी निवड समितीचा भागही राहिलेले आहेत. ते 2023 साली नॅशलन सिलेक्टर म्हणून नियुक्त झाले होते. ऑगस्ट 2024 पर्यंत ते या पदावर होते.

भारतासाठी 20 एकदिवसीय सामने खेळले

अंकोला यांनी 1989 साली पहिल्यांदा भारतीय संघासाटी कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून डेब्यू केला. त्यांचा हा पहिला सामना पाकिस्तानातील कराची येते झाला होता. या सामन्यात त्यांनी दोन गडी बाद केले होते. याच कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानी खेळाडू वकार युनिस यांनी डेब्यू केला होता. अंकोला यांनी भारतासाठी 20 एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. या सामन्यांत त्यांच्या नावावर एकूण 13 विकेट्स आहेत. त्यांनी आपला शेवटचा एकदिवसीय सामना 1997 साली खेळला. त्यांनी आपल्या करिअरमध्ये 54 प्रथम श्रेणीचे सामने खेळले. त्यांना हनवटीवर गंभीर इजा झाली होती. त्यामुळे पुढे ते कधीच क्रिकेट खेळू शकले नाहीत. त्यांनी 1997 साली क्रिकेटमधून सन्यास घेतला.

Follow Us
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On OBC | ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप; राज्यपालांच्या भेटीनंतर राजकारण तापलं
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर..
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर भरुन...