AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईतील आंदोलनाबाबत मनोज जरांगे पाटलांचा मोठा निर्णय, अंतरवाली सराटीमधून थेट मोठी घोषणा

मोठी बातमी समोर येत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे. त्यांनी मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. यावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईतील आंदोलनाबाबत मनोज जरांगे पाटलांचा मोठा निर्णय, अंतरवाली सराटीमधून थेट मोठी घोषणा
Manoj Jarange PatilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 11, 2026 | 6:00 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे. त्यांनी आता मुंबईत आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे, परंतु याविरोधात मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या संदर्भात न्यायालयाने मोठा निर्णय घेतला मनोज जरांगे पाटील यांना परवानगीशिवाय मुंबईत आंदोलन करता येणार नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? 

आम्ही सर्व नियमांचं पालन करून मुंबईत आंदोलन करू, सरकारने आम्हाला न्याय दिला नाही तर आम्हाला न्याय देवता न्याय देईल, आम्ही लोकशाही मार्गाने आझाद मैदानावर आंदोलन करणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तुम्ही शिवरायांना मानणारे असाल तर आंदोलनात विघ्न आणू नका. आम्ही परवानगीसाठी अर्ज केला आहे. सरकारनं आडमुठेपणाची भूमिका घेऊ नये, लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनाला परवानगी द्यावी, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान परवानगीशिवाय मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आंदोलन करता येणार नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे. जरांगे पाटील यांच्याकडून परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे, मात्र आता या आंदोलनाला परवानगी मिळणार का?  हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आम्ही छत्रपतींना आणि हिंदूंना मानणारे आहोत गणेशोत्सवात आमच्याकडून विघ्न येणार नाही.पण छत्रपतींना मानणारे मुख्यमंत्री यांनी लक्षात घ्यावे की गणेशोत्सव हा लोक समूह एकत्र यावा आणि अन्याय अत्याचार दूर व्हावा म्हणून सुरू झालेला आहे. मुंबईत येणाऱ्या एकही आंदोलकांकडून विघ्न येणार नाही पण सरकारने विघ्नाच्या भूमिकेत येऊ नये. ज्या ज्या वेळी सरकाकडून गोरगरिबांवर अन्याय होतो.सरकारकडून भविष्य उद्ध्वस्त होतं. त्यावेळी न्यायालय गोरगरिबांना न्याय देतं. आम्ही न्यायालयाचे आभारी आहोत, लोकशाहीतील अधिकार सोडून आम्ही आंदोलन करणार नाही. 100 टक्के लोकशाही मार्गाने आंदोलन करू आझाद मैदानावर आंदोलन करू, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

Follow Us
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On OBC | ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप; राज्यपालांच्या भेटीनंतर राजकारण तापलं
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर..
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर भरुन...