
भारतामध्ये सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत, एक तोळा सोने खरेदीसाठी 80 हजारांच्या आसपास पैसे मोजावे लागत आहेत. दुसरीकडे चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे.सोन्याचे दर वाढत असल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक देखील वाढली आहे.

गेला आठवडा भर सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठा चढउतार पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर काही प्रमाणात कमी झाल्यानं सराफा बाजारात तेजी पहायला मिळाली.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज 24 कॅरेट सोन्याचे दर हे 85 हजार 56 रुपये प्रति तोळा एवढे असून, 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 77 हजार 911 रुपये एवढे आहेत.

दुसरीकडे चांदीचे दर देखील गगनाला भिडले आहेत.इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशने जाहीर केलेल्या दरानुसार आज चांदीचा दर प्रति किलो 93,480 रुपये एवढा आहे. सोन्या-चांदीचे दर शहरानुसार कमी किंवा जास्त होत असतात.

दरम्यान भारतामध्ये सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र जगात असे देखील काही देश आहेत, जिथे सोनं खूपच स्वस्त मिळतं. त्यात दुबईचा देखील समावेश आहे. जाणून घेऊयात दुबईमधील सोन्याचे दर

दुबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 3432.50 AFD एवढा आहे. हा दर भारताच्या तुलनेनं स्वस्त आहे.

भारतीय रुपयांमध्ये हा दर सांगायचा झाल्यास दुबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 81752 रुपये एवढा आहे. भारत आणि दुबईमधील सोन्याच्या दराची तुलना केल्यास दुबईमध्ये सोनं स्वस्त मिळतं.