Gold: सोने खरेदीचा ट्रेंड बदलला, लोक दागिन्यांऐवजी ‘या’ वस्तूमध्ये करतायेत गुंतवणूक

Gold Price: सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता लोकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. तसेच जे लोक सोने खरेदी करत आहेत, ते दागिन्यांऐवजी दुसऱ्या वस्तूंमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत.

| Updated on: Oct 14, 2025 | 10:01 PM
1 / 5
भारतात दिवाळीला मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाते. अनेकजण दिवाळीच्या मुहुर्तावर दागिने खरेदी करत असतात. मात्र यंदा लोक दागिन्यांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. दागिने खरेदीत घट झाली आहे.

2 / 5
या वर्षी सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोने जवळजवळ 50 टक्क्यांनी महाग मिळत आहे. त्यामुळे लोक सोने खरेदीकडे पाठ फिरवत आहेत. रक्षाबंधनाच्या काळात सोन्याच्या विक्रीत घट झाली होती.

3 / 5
सोन्याच्या किमती सव्वा लाखाच्या पुढे गेल्या आहेत, त्यामुळे लोक आता जड दागिने खरेदी करण्यापेक्षा लहान नाणी किंवा हलके दागिने पसंत करत आहेत. सराफा बाजारात 2 ते 5 ग्रॅम सोन्याच्या नाण्यांची मागणी वाढली आहे.

4 / 5
समोर आलेल्या माहितीनुसार, लोक दागिन्यांऐवजी शुद्ध सोन्याची नाणी किंवा गोल्ड बार खरेदी करत आहेत. याचे कारण म्हणजे यावर उत्पादन शुल्क आकारले जात नाही, त्यामुळे अतिरिक्त खर्च वाचतो.

5 / 5
भारतीय बाजारपेठेत 18 कॅरेट सोन्याची मागणी वाढताना दिसत आहे. पूर्वी ते हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये वापरले जात होते, मात्र आता ते पारंपारिक डिझाइनमध्ये वापरले जात आहे.