सोनं चोरी झाले तर पैसे परत मिळणार, पण खरेदी करताना ही गोष्ट लक्षात ठेवा

राज्यात अनेक शहरात महिलांच्या गळ्यातील सोन्याची चेन, पोत, मणीमंगळसूत्र हिसकावण्याचे अनेक प्रकार वाढले आहेत. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अथवा मागून येऊन अचानक हल्ला करण्यात येतो. अशावेळी मोठं नुकसान होतं. त्याची भरपाई अशाप्रकारे करता येते.

Updated on: Nov 28, 2025 | 4:51 PM
1 / 6
Gol Jewellery Insurance Policy: भारतात सोने हे समृद्धी आणि संपन्नतेचे प्रतिक मानल्या जाते. सणासुदीला आणि इतर चांगल्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी करण्यात येते. पण सोने घालून मिरवणे तितके सोपे राहिलेले नाही. सोने चोरट्यांची टोळी सक्रिय आहे. अनेक शहरात महिलांच्या गळ्यातील सोनंसाखळी,मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे मोठे नुकसान होते.

2 / 6
या सोने चोरीची तुम्हाला भरपाई मिळू शकते. त्यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या ज्वैलर्सकडून सोन्याची दागिने खरेदी करता तेव्हा त्यावर मोफत विमा मिळतो. जेव्हा सोने हरवते अथवा चोरी होते. तेव्हा या योजनेचा फायदा होतो.

3 / 6
अनेक ज्वैलर्स, सोन्याचे दुकानदार, मालाबार, तनिष्क, सॅन्को गोल्ड अँड डायमंड सारख्या अनेक कंपन्या खरेदीदारांना फ्री इन्शुरन्सचा फायदा देतात. पण याविषयीची माहिती अनेक ग्राहकांना नसते. तुम्ही खरेदी करताना याविषयीची माहिती घेऊ शकता.

4 / 6
जेव्हा तुम्ही ज्वैलर्सकडून सोने खरेदी करता. तेव्हा हा मोफत विमा देण्यात येतो. या विमा पॉलिसीत तुमच्या सोन्याचे नुकसान भरपाई करण्यात येते. भूकंप, इतर देशाचा हल्ला, पूर, दंगेधोपे, चेन स्नॅचिंग, दरोडा, अपघात यावेळी सोन्याच्या दागिन्यांचे नुकसान झाले तर त्यासाठी दावा करता येतो.

5 / 6
जर तुमचे सोने हरवले आणि तुम्ही पोलिसांमध्ये रीतसर तक्रार नोंदवली. तुमच्याकडे याविषयीची कागदपत्रं असतील तर विमा पॉलिसीत ज्या कारणांसाठी नुकसान भरपाई दिल्या जाते, त्यानुसार, तुम्हाला नुकसान भरपाई मिळते.

6 / 6
तुम्हाला तुमचे दागिने परत मिळण्याची शाश्वती कमी असते. पण या विमा पॉलिसीत तुम्हाला मेकिंग चार्जेस आणि कर द्यावा लागतो. या विमा पॉलिसीतंर्गत ग्राहकाला दागिन्यांच्या मूल्याच्या  95% पर्यंत विमा संरक्षण देण्यात येते.