Gold Price : सोनं स्वस्त का होतं? कारण तरी काय?
सोन्याच्या दरात मोठी घसरण का झाली? मजबूत डॉलर, वाढते बाँड यील्ड, नफावसुली आणि घटलेली मागणी यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव आला आहे. जाणून घ्या घसरणीमागची प्रमुख कारणे.

संकटकाळी सोने ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, परंतु सध्य स्थितीला आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमती सतत घसरत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठात, कॉमेक्सवर सोन्याची किंमत प्रति औंस 4166.40 डॉलरपर्यंत, तर देशांतर्गत बाजारातही प्रति 10, ग्रॅम 1.48 लाख रुपयांपर्यंत खाली आले आहे. या घसरणीमागील नेमकी कारणे काय आहेत पाहा.
आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची हालचाल ही अमेरिकन डॉलरच्या कामगिरीवर अवलंबून असते. जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा इतर देशांचे चलन वापरणाऱ्या खरेदीदारांसाठी तो महाग होतो.
यामुळेच जागतिक स्तरावर सोन्याच्या खरेदीत घट होते आणि याचा परिणाम अला की किमतीत घट होते. अमेरिकन बाँड यील्ड्समधील वाढीमुळेही सोन्याची किंमत कमी झाल्याचे समजते.
बाजारातील या नफावसुलीच्या दबावामुळे किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. व्याजदरांच्या शक्यतेचा सोन्यासारख्या व्याज न देणाऱ्या मालमत्तेच्या मागणीवर नकारात्मक परिणाम होतो.
सोमवारी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकेबंदी उठवण्याच्या बदल्यात होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याचा आणि अणुचर्चा पुन्हा सुरू करण्याचा इराणचा प्रस्ताव फेटाळला.
या नव्या राजनैतिक भूमिकेमुळे COMEX वरील सोन्याच्या किमती 4,200 डॉलर प्रति औंस या मानसिक पातळीच्या खाली घसरल्या, ज्यामुळे बाजारातील अनिश्चितता आणखी वाढली आहे.
देशांतर्गत, भारतातील सोन्याची मागणी काहीशी मंदावलेली आहे. आगामी सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या हंगामापूर्वी, सराफा व्यापारी आणि ग्राहक भावात आणखी घट होण्याची वाट पाहत आहेत.
किरकोळ मागणीतील या कमकुवतपणामुळे भारतीय बाजारातील सोन्याच्या घसरणाऱ्या किमतींना आधार मिळण्याऐवजी, त्यांच्यावर आणखी दबाव वाढला आहे.