Todays Gold Rate: आता तर शक्यच नाही! सोने खरेदी करताना खिसा होणार खाली, आज 10 ग्रॅमसाठी तब्बल…

Todays Gold Rate: गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचा दरात घसरण होत असल्याचे पाहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा सोन्याचे भाव चांगलेच वाढले आहेत. आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती वाचा...

| Updated on: Mar 25, 2026 | 3:14 PM
1 / 5
अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांनी इराणवर हल्ला केल्यानंतर सोन्याचे भाव चांगलेच कोसळले होते. पण नुकताच युद्ध थांबवण्याची घोषणा करताच हे भाव पुन्हा आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार चला जाणून घेऊया...

अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांनी इराणवर हल्ला केल्यानंतर सोन्याचे भाव चांगलेच कोसळले होते. पण नुकताच युद्ध थांबवण्याची घोषणा करताच हे भाव पुन्हा आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार चला जाणून घेऊया...

2 / 5

आज 25 मार्च रोजी सोन्याचे भाव आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करताना विचार करावा लागणार आहे. अक्षरश: त्यांचा खिसा खाली होणार आहे.

3 / 5

दोन दिवसांपासून सलग घसरण झाल्यानंतर आता सोन्याचे भाव पुन्हा 5 हजार रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीच्या दरात 20 हजार रूपयांची मोठी वाढ झाली आहे.

4 / 5

10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 49 हजार 865 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 1 किलो चांदीचे दर 2 लाख 47 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहेत.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us