Gold Rate : सराफा बाजारात मोठी खळबळ, सोनं 11000 धाडकन कोसळलं, वाचा सध्याचा भाव काय?

13 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,35,809 रुपये होता. मात्र, 20 नोव्हेंबरपर्यंत हा दर घसरून 1,23,893 रुपयांवर आला. म्हणजेच अवघ्या एका आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 11,916 रुपयांची घट झाली.

| Updated on: Nov 22, 2026 | 7:16 PM
1 / 5
भारतीय बाजारात गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, 13 ते 20 नोव्हेंबरदरम्यान सोन्याचे दर झपाट्याने कमी झाले. यामुळे सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

2 / 5

13 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,35,809 रुपये होता. मात्र, 20 नोव्हेंबरपर्यंत हा दर घसरून 1,23,893 रुपयांवर आला. म्हणजेच अवघ्या एका आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 11,916 रुपयांची घट झाली.

3 / 5

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही मोठी घसरण पाहायला मिळाली. संबंधित कालावधीत चांदीचा दर प्रति किलो 25,472 रुपयांनी कमी होऊन 1,52,528 रुपयांवर आला. त्यामुळे मौल्यवान धातूंच्या बाजारात सध्या घसरणीचे चित्र पाहायला मिळत आहे.

4 / 5

जानेवारी 2026 मध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1.80 लाख रुपये होता. 20 नोव्हेंबर 2026 पर्यंत IBJA चा 24 कॅरेट सोन्याचा दर 1,23,893 रुपयांवर आल्याने सोनं उच्चांकाच्या तुलनेत जवळपास 31 टक्क्यांची घसरलं आहे.

5 / 5

टीप- आम्ही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. काळजीपूर्वक गुंतवणूक करावी. योग्य सल्लागाराचा सल्ला घ्यावा. ही स्टोरी फक्त माहितीसाठी देण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us