Gold Rate : सोन्याचे सर्वात वाईट दिवस, भाव थेट 20000 रुपयांनी घसरला; 10 ग्रॅमचा रेट आता किती?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतो आहे. सध्या मात्र सोन्याची घसरण चालू झाली आहे.

| Updated on: Feb 11, 2026 | 9:11 PM
1 / 5
सोन्याचा भाव कधी वाढेल आणि कधी कमी होईल हे सांगता येत नाही. सध्याच्या जागतिक भू-राजकीय अस्थिरतेमुळे तर या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत सतत चढउतार होताना पाहायला मिळत आहे. कधीकाळी सोन्याचा भाव एवढा वाढला होता की सामान्यांना ते खरेदी करणे अशक्य होऊन बसले होते.

सोन्याचा भाव कधी वाढेल आणि कधी कमी होईल हे सांगता येत नाही. सध्याच्या जागतिक भू-राजकीय अस्थिरतेमुळे तर या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत सतत चढउतार होताना पाहायला मिळत आहे. कधीकाळी सोन्याचा भाव एवढा वाढला होता की सामान्यांना ते खरेदी करणे अशक्य होऊन बसले होते.

2 / 5

आता मात्र सोन्याचा भाव कमी होताना दिसतोय. सोन्याच्या सार्वकालिक उच्चांकाचा विचार करायचा झाल्यास सोन्याचा भाव तब्बल 20000 रुपयांनी कमी झाला आहे. म्हणजेच मध्यमवर्गीय आणि गरिब लोकांना हा एका प्रकारे दिलासाच मानायला हवा.

3 / 5

सोन्याचा भाव आपल्या सार्वकालिक उच्चाकांच्या तुलनेत सध्या तब्बल 20008 रुपयांनी कमी झाला आहे. सोन्याचा आतापर्यंतच सार्वकालिक उच्चांकी भाव 176121 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आता हाच भाव 160796 रुपये (जीएसटीसह) प्रति 10 ग्रॅमपर्यंत कमी झाला आहे.

4 / 5

दरम्यान, सध्या जरी सोन्याचा भाव कमी होताना पाहायला मिळत असला तरी, दीर्घकाळाचा विचार केल्यास पुन्हा एकदा हा भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून विचार करायचा असल्यास सोन्यात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते, असे म्हटले जात आहे.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us