सोन्याचा भाव प्रचंड वाढला, काही तासांत मोठी उलथापालथ, तब्बल…10 ग्रॅमच्या दागिन्यासाठी सगळाच खिसा खाली होणार!

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात कधी वाढ तर कधी घसरण होत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव वाढला आहे. सोन्याच्या भावात झालेली ही वाढ पाहून सामान्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. भविष्यात अशीच भाववाढ होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

| Updated on: May 06, 2026 | 4:56 PM
1 / 5
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दारात विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 2 हजार 900 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 7 हजार रुपयांची वाढ झाली आहे.  सोन्याच्या दरात वाढ झाल्याने सामान्यांचा खिसा आता रिकामा होणार आहे.

2 / 5
सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 55 हजार 221 रुपये प्रती 10 ग्रॅमवर तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 58 हजार 350 रुपये प्रति एक किलो रुपयांवर पोहोचला आहे. अमेरिका व इराण यांच्यातील युद्धविरामासंदर्भात बैठक होऊन चर्चा होणार असल्याने त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाल्याचं सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

3 / 5
दोन्ही देशांमध्ये आज युद्धविरामासंदर्भात चर्चा झाली तर सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ होण्याचा अंदाज सराफ व्यावसायिक यांनी व्यक्त केला आहे. भाव कमी असल्यामुळे आज खरेदी करायला आलो मात्र भाव वाढल्यामुळे खरेदी करताना जास्त पैसे द्यावे लागले, अशी भावना जळगावच्या सराफा बाजारात व्यक्त केली जात आहे.

4 / 5
घरात लग्न आहे, भाव कमी असतील म्हणून चांगली हौस करता येईल अशी इच्छा होती, मात्र आजच भाव वाढल्याने महिलाही नाराज असल्याचे दिसत आहे. भविष्यात सोन्याचा भाव असाच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Follow Us