
अमेरिकेत सत्ता पालट झाली आहे. त्याचा परिणाम जागतिक बाजारावर दिसून येत आहे. सोन्याची मागणी घटली आहे. तर बदलेल्या अमेरिकन धोरणाचा व्यापार आणि व्यवसायावर परिणाम होत आहे. सोने-चांदीत अजून घसरण होण्याची शक्यता आहे.

सोने आणि चांदी

क्रिप्टोकरन्सी आणि शेअर बाजाराला पुन्हा अच्छे दिन आले आहे. अमेरिकेतील शेअर बाजारात तेजीचे सत्र आले आहे. दुसरीकडे डॉलर निर्देशांक दिवसागणिक नव्या उंचीवर पोहचत आहे. या सर्वांमुळे गुंतवणूकदार आता सोने-चांदीत गुंतवणूक न करता इतर पर्याय शोधत आहे.

गेल्या 15 दिवसांत सोने आणि चांदीत मोठी घसरण दिसली. सोने 5 हजारांनी उतरले आहे. तर येत्या काळात सोन्याच्या किंमतीत 5,000 रूपयांपर्यंत घसरणीचा अंदाज आहे.

तर सोन्याचा भावा २२ नोव्हेंबर रोजी ८०० रुपये, २३ रोजी ४०० रुपयांची वाढ होऊन सोने ७८ हजार ९०० रुपयांवर पोहोचले होते. रविवारी हाच भाव कायम होता.

या लग्नसराईत सोने आणि चांदी ग्राहकांना अजून मोठा दिलासा देण्याची शक्यता एचडीएफसी सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता यांनी दिली. त्यांनी खरेदीदारांना सबुरीचा सल्ला दिला आहे.