Gold Rate : सोनं धाडकन कोसळलं, तब्बल 70000 रुपयांनी स्वस्त, उच्चांकाच्या तुलनेत…आजचा भाव काय?

MCX वर सोन्याने जवळपास 1.93 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठला होता. मात्र, आता सोने त्या उच्चांकापेक्षा 70 हजार रुपयांहून अधिक स्वस्त मिळत आहे.

| Updated on: Nov 25, 2026 | 8:59 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) 4 डिसेंबरला एक्सपायरी असलेल्या 24 कॅरेट सोन्याचा दर 1,20,346 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. मागील सत्राच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत 1,983 रुपयांची घट झाली.

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) 4 डिसेंबरला एक्सपायरी असलेल्या 24 कॅरेट सोन्याचा दर 1,20,346 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. मागील सत्राच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत 1,983 रुपयांची घट झाली.

2 / 5

सोन्याच्या सध्याच्या दराची तुलना त्याच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च किमतीशी केली, तर मोठी तफावत दिसून येते. MCX वर सोन्याने जवळपास 1.93 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठला होता. मात्र, आता सोने त्या उच्चांकापेक्षा 70 हजार रुपयांहून अधिक स्वस्त मिळत आहे.

3 / 5

मंगळवारी गुरुनानक जयंतीनिमित्त सकाळच्या सत्रात MCX वरील व्यवहार बंद होते. मात्र, संध्याकाळी बाजार सुरू झाल्यानंतर सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्येही या दरबदलाची चर्चा सुरू झाली आहे.

4 / 5

सोमवारच्या व्यवहारात 24 कॅरेट सोन्याचा दर 1,25,996 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यानंतर मंगळवारी हा दर घसरून 1,22,329 रुपयांवर पोहोचला. एकाच व्यवहार सत्रात सोन्याच्या किमतीत 3,667 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली.

5 / 5

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठी पडझड पाहायला मिळाली. सोमवारी चांदीचा दर 1,54,217 रुपये प्रति किलो होता. हा दर मंगळवारी घसरून 1,45,438 रुपयांवर आला. म्हणजेच चांदी एका दिवसात तब्बल 8,779 रुपयांनी स्वस्त झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us