सोने v/s बँक एफडी: सोने की एफडी, तुमचे पैसे नेमके कुठे सुरक्षित ?

सोन्या आणि चांदीचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. जेव्हा केव्हा जागतिक भूराजकीय अस्थिरता निर्माण होते, त्यावेळी सोन्याला प्रचंड मागणी होते. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ होत असते.

| Updated on: Feb 26, 2026 | 8:43 PM
1 / 5
 गेल्या काही वर्षांत गुंतवणूकीसाठी विविध पर्यायांचा वापर करणे सुरु केले आहे. एकेकाळी गुंतवणूकदार प्रामुख्याने बँक एफडी आणि पोस्ट ऑफीस योजनांमध्ये गुंतवणूक करीत असत.

गेल्या काही वर्षांत गुंतवणूकीसाठी विविध पर्यायांचा वापर करणे सुरु केले आहे. एकेकाळी गुंतवणूकदार प्रामुख्याने बँक एफडी आणि पोस्ट ऑफीस योजनांमध्ये गुंतवणूक करीत असत.

2 / 5

मात्र, काळानुरुप गुंतवणुकीचे प्रकार देखील बदलत चालले आहेत. गुंतवणूकदार आता सोने, चांदी, म्युच्युअल फंड, स्टॉक आणि बाँडमध्ये गुंतवणूक करीत आहेत. सध्याच्या काळाचा विचार करून सोने आणि बँक एफडी यातला कोणता गुंतवणूक पर्याय सर्वात जास्त सुरक्षित आहेत हे आपण पाहूयात..

3 / 5

सोन्यातील गुंतवणूक कधीही निश्चित आणि हमी परतावा देत नाही. मात्र सोने हे दीर्घकाळात लक्षणीय नफा देऊ शकते. शिवाय, सोन्याचे भाव हे सतत वाढतच आहेत. चलनाचे मूल्य कमी झाल्यावर सोन्याचे मूल्य नेहमीच वाढते. सध्या सोन्याच्या किमतींमध्ये वेळोवेळी प्रचंड चढ-उतार होत आहेत.

4 / 5

बँक एफडी: सामान्य गुंतवणूकदारांकडून अजूनही बँक एफडी सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. तुम्ही बँक एफडीमध्ये किमान ७ दिवसांपासून ते जास्तीत जास्त १० वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. एफडी निश्चित कालावधीनंतर परिपक्वतेवर निश्चित परतावा देते.

5 / 5

भारत सरकार ५ लाखांपर्यंतच्या ठेवींना विम्याचे संरक्षण देत असते. जर तुमची बँक आर्थिक परिस्थितीमुळे दिवाळखोरीत निघाली तर तुम्हाला ५ लाख रुपयांपर्यंतचा विमा रक्कम मिळते. मात्र, जरी तुम्ही बँकेत ५० लाख जमा केले असले तरीही, बँक दिवाळखोर झाल्यास तुम्हाला कमाल ५ लाख रुपयांची भरपाई मिळते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us