AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसा आहे तब्बल २५०० कोटींचा सिनेमा? ख्रिस्टोफर नोलनच्या The Odyssey ची जगभर महाक्रेज

दिग्दर्शक ख्रिस्टोफर नोलन यांचा 'दि ओडिसी' हा चित्रपट सध्या जगभरात चर्चेत आहे. हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. डंकर्क, ओपनहायमर आणि इंटरस्टेलर सारखे चित्रपट देणारे नोलन यांचा The Odyssey कसा आहे याचा रिव्ह्यू तुमच्यासाठी...

कसा आहे तब्बल २५०० कोटींचा सिनेमा? ख्रिस्टोफर नोलनच्या The Odyssey ची जगभर महाक्रेज
The Odyssey - Director Christopher Nolan
| Updated on: Jul 17, 2026 | 4:27 PM
Share

हॉलिवूड दिग्दर्शक ख्रिस्टोफर नोलन याचा ‘ओपन हायमर’ साल २०२० साली आला होता. अणुबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर ( J. Robert Oppenheimer ) यांच्यावर हा चित्रपट बेतला होता. ख्रिस्टोफर नोलन या नावाचं गारुड सिने चाहत्यांवर असे आहे की हा दिग्दर्शक कॅमेऱ्याच्या मागे उभा राहिला तर पडद्यावर काही तरी नवा इतिहास रचला जाणार आहे याची खात्री प्रेक्षकांना असते. इंटरस्टेलर ( २०१४ ), डंकर्क ( २०१७ ) , ओपनहायमर ( २०२३ ) आणि आता दि ओडीसी ( The Odyssey ) उद्या रिलीज होत आहे.  त्यामुळे पडद्यावर  काही रोमांचक आणि साहसी पाहायला मिळणार आहे याची खात्री प्रेक्षकांना आहे.

तीन तासांचा ‘दि ओडिसी’  सिनेमा स्क्रीनवर जेव्हा सुरु होतो. तेव्हा तुम्ही आजूबाजूचे जग विसरुन भान हरपून वेगळ्याच जगात जाता. मॅट डेमन, टॉम हॉलंड आणि ऐनी हॅथवे अशा दिग्गज कलाकारांचा भरणा असलेला हा चित्रपट सिनेमा या कलेचा का जन्म झाला असावा याचे उत्तर आहे. एक्शन आणि इतिहासातील पौराणिक ग्रीक गाथा पडद्यावर पाहाताना तुम्ही त्या जगातले होऊन जाता..असा हा सिनेमा उत्तम बनला आहे.

या चित्रपटाच्या केंद्रस्थानी हॉलिवूड स्टार मॅट डेमन आहे. ज्याने ‘ओडिसियस’ हे पात्र त्याच्या संपूर्ण अभिनय कारकीर्दीतील जीव ओतून साकारत अक्षरश: अमर केले आहे. नोलन याचा ओडिसियस हा काही पारंपारिक सर्वच बाबतीत परफेक्ट असणारा नायक नाही. हा चुका करणारा आणि त्यातून शिकणारा हाडामासाचा योद्धा साकारला आहे. हे कॅरेक्टर त्याने अक्षरश: जगले आहे. त्याचे हत्यार तलवार नसून त्याची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कधीही हार न मानण्याची जिगर आहे. ट्रोझन हॉर्सपासून बचाव करीत पळण्याची कृती किंवा जादूगर सर्सी हिच्या सापळ्यातून आपल्या सैन्याची सुखरुप सुटका करणे, आपल्या घरी मातृभूमीला जायची त्याला लागलेली ओढ, दु:ख आणि वेदना, पश्चाताप अशा संमिश्र भावना त्याने पडद्यावर अशा साकारल्या आहेत की प्रेक्षक त्याच्यात गुंतून पडतो.

स्पायडर साकारणारा अभिनेता

स्पायडर मॅनचे पात्र साकारणारा अभिनेता टॉम हॉलंड देखील या सिनेमात वेगळ्या आणि संवेदनशील भूमिकेत आहे. त्याने सुपर हिरोची इमेज सोडून टेलिमॅकस याचे भावनिक पात्र साकारले आहे. वडिलांच्या छत्राशिवाय वाढलेल्या एका कमजोर मुलाचे पात्र त्याने साकारले आहे. ऐनी हॅथवे हीने युद्ध मोहिमेवर गेलेल्या पतीची अनेक वर्षे वाट पाहणाऱ्या आणि आपल्या राज्याचे संरक्षण करणारी राणीचे कॅरेक्टर उत्तम वटवले आहे. जेंडाया या अभिनेत्रीला कमी रोल मिळाला असला तरी तिने पडद्यावरील सीनमध्ये आपली छाप सोडली आहे. हा चित्रपट मल्टी स्टारर असला तरी कोणतेही पात्र गैरलागू वाटत नाही. प्रत्येकाचा रोल महत्वाचा वाटतो.

‘दि ओडिसी’ केवळ देवता, राक्षस, चमत्कार आणि राजांची काल्पनिक कहानी नाही. तर युद्धाच्या भयानक मानवीय किंमतीला संपूर्ण संवेदनशीलपणे पडद्यावर साकारणारी गोष्ट आहे. दिग्दर्शन ख्रिस्टोफर नोलन यांनी ग्रीक पौराणिक मान्यता आणि ज्यूसच्या दैवीय नियमांना मानवी भावनांशी जोडून एक मार्मिक सैनिकांची गाथा पडद्यावर चितारली आहे. युद्धात आपली जिवलग माणसे गमावण्याचे दु:ख, घराची उबदार ओढ आणि युद्धाची किंमत ही सर्व मुल्ये अनेकदा रुपेरी पडद्यावर आलेली असली तर ती ख्रिस्तोफर नोलन यांच्या भेदक नजरेतून ती पाहाणे हे खूपच महत्वाचे असल्याचे क्षणोक्षणी आपल्यास जाणवते.

श्वास रोखणारा क्लायमॅक्स

या चित्रपटाचा अर्क म्हणजे याचा शेवटच्या अर्ध्या तासांचा क्लायमॅक्स आहे.  हा शेवट तुमच्या मनावर आणि शरीरावर अक्षरश: काटा उभा करतो. क्लायमॅक्स वेगवान घडामोडी, एक्शन, इमोशन आणि अनेक वर्षांपासून मनात कोंडलेल्या वाफेला बाहेर पडण्याची मिळालेली वाट याचा बेजोड नमुना आहे. जो शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. तुम्हाला डोळ्यांच्या पापण्या मिटू नयेत असे वाटावे  इतक्या खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या घडामोडी या क्लायमॅक्समध्ये आहेत आणि श्वास रोखून तुम्हाला त्या पाहाव्या लागतील असा भावनांचा कल्लोळ यात आहे.

IMAX कॅमेऱ्यांनी चित्रित केलेला महायुद्ध पट

IMAX कॅमेऱ्यांनी शुट केलेला हा सिनेमा आयमॅक्सच्या भव्य पडद्यासाठीच तयार झालेला आहे. या भव्य आयमॅक्स कॅमेऱ्यात एकावेळी तीन मिनिटांचा सीन चित्रीत करता येतो. चित्रपटातील दीर्घ आणि विना कट असणारी दृश्य पाहून याची जाणीव होते की यातील पडद्या मागील कलाकार आणि क्रुने प्रत्येक सीनसाठी  किती तगडी रिहर्सल आणि मेहनत केली असेल. बॅकग्राऊंड म्युझिक या चित्रपटातील स्वतंत्र कॅरेक्टर आहे. ही महागाथा शुक्रवारपासून पडद्यावर कोणता नवा इतिहास रचते ते उद्यापासून कळणार आहे.

चित्रपटाचा ट्रेलर येथे पाहा –

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा