AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘डर्टी संजय राऊत.., लाज वाटायला पाहिजे…’, राणेंचं राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर; नागपुरातील रामरक्षा आंदोलनापूर्वी वातावरण तापलं

शिवसेना ठाकरे गटाचं येत्या 18 जुलै रोजी नागपुरात 'रामरक्षा' आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी फडणवीस यांना एक पत्र लिहिलं होतं, या पत्रानंतर आता वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे.

'डर्टी संजय राऊत.., लाज वाटायला पाहिजे...', राणेंचं राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर; नागपुरातील रामरक्षा आंदोलनापूर्वी वातावरण तापलं
नितेश राणेंचं राऊतांना प्रत्युत्तर Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 16, 2026 | 9:06 PM
Share

अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यभरात ‘रामरक्षा’ आंदोलन सुरू आहे. येत्या 18 जुलै रोजी नागपुरात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या आंदोलनात सहभागी होण्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं होतं. परंतु आता या पत्रावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. मंत्री नितेश राणे यांनी देखील एक पत्र लिहून संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  त्यांनी हे पत्र ट्विटरला शेअर केलं आहे.

नेमकं काय म्हणाले नितेश राणे? 

‘प्रति मा. संजय राऊतजी, आमचे नेते मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिताना आपण तर कहरच केला. प्रभू श्रीरामाच्या सुरक्षेपर्यंत जाऊन पोहोचला. जे प्रभू श्रीराम सर्वांची सुरक्षा करतात, त्यांची सुरक्षा आपण केव्हापासून करायला लागला? रामरक्षा पाठ असणे तर दूर, पुस्तकात पाहूनही रामरक्षेची दोन पानं आपला नेता धड वाचू शकत नाही आणि निघाले मा. देवेंद्रजींना सल्ला द्यायला…लाज वाटायला पाहिजे.

जर तुम्हाला काही करायचे असेल तर रामाच्या नावाने राजकारण बंद करा. अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी आंदोलनात काडीचा सहभाग तुमचा नव्हता. ना उद्धव ठाकरेजी सहभागी झाले होते. ज्या कार्यकर्त्यांनी लाठी, गोळ्या खाऊन तुमच्या आजच्या सहकारी काँग्रेस पक्षाविरोधात आंदोलने केली आणि हा ऐतिहासिक लढा जिंकला, त्या अनेक पिढ्यांपैकी एक मा. देवेंद्रजी आहेत. तिन्ही कारसेवांना उपस्थित राहणारे आमचे नेते मा. देवेंद्रजी आहेत. रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या नेत्यांच्या मांडीवर बसून पुळका दाखवू नका, किमान रामाच्या नावाने राजकारण करू नका, नागपुरात चाललेच आहात, तर संघभूमीवर नाक रगडून आतापर्यंत केलेल्या पापांची माफी मागा..डर्टी संजय राऊत..’ असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी पत्रात काय म्हटलं होतं?

‘प्रति मा. श्री देवेंद्र फडणवीसजी जय महाराष्ट्र, आपण एक प्रखर रामभक्त आणि कडवट हिंदुत्ववादी आहात. अयोध्येतील राम जन्मभूमी मुक्त करण्याच्या आंदोलनात आपण सहभागी झाल्याचे आपण नेहमी सांगता. आपल्यासारख्या लाखो राम भक्तांच्या संघर्षातून राम जन्मभूमी मुक्त झाली व अयोध्येत श्रीराम मंदिर उभे राहिले. याच राम मंदिरात चोरी, लुटमार, फसवणूक असे गुन्हे घडत आहेत व शेकडो कोटींचा अपहार झाला. खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अयोध्येतील चोरीबाबत शोक व्यक्त केला. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या राम मंदिर लुटीबाबत लोकांत जागृती आणण्यासाठी ‘रामरक्षा’ उपक्रम सुरू केला, रामरक्षा म्हणजे रामाची सुरक्षा हे समजून घ्या. दिनांक 18 जुलै 2026 रोजी सायंकाळी साडेचार वाजता राम मंदिर- रामनगर, नागपूर येथे ‘रामरक्षा’ उपक्रम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित होत आहे, सदर कार्यक्रम नागपुरात होत असल्याने आपण या ‘रामरक्षा’ उपक्रमात आवर्जुन सहभागी होऊन राम भक्तांना शुभेच्छा द्याव्यात, ही आग्रहाची विनंती’ असं पत्र संजय राऊत यांनी फडणवीस यांना लिहिलं आहे.’

Follow Us
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर