Govinda Gf: अखेर गोविंदाच्या GFने सोडले मौन, अफेअरच्या चर्चांबाबत बोलताना सुनिता अहूजाला घेरलं

Govinda Gf: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा हा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदाची कथित गर्लफ्रेंड कोमलवर सुनिता अहुजाने अनेक आरोप केले. आता त्यावर कोमलने प्रतिक्रिया दिली आहे.

| Updated on: Sep 27, 2026 | 8:22 AM
1 / 5
गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याभोवती सुरू असलेल्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. गोविंदा आणि कोमल रानी स्वर्णकार यांच्या लालबागचा राजाच्या दरबारातील एकत्र उपस्थिती सोशल मीडियावर खळबळ माजवली ठरली. त्यानंतर सुनीता पुन्हा एकदा संतापली. त्यांनी जेन-जी कडून सपोर्ट मागत म्हटले की त्यांचे घर तोडले जात आहे आणि त्यांच्यासोबत खूप अन्याय होत आहे. आता या सगळ्यावर कोमल राणी स्वर्णकारने प्रतिक्रिया दिली आहे.

2 / 5

गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने सतत कोमलवर आरोप केले आहेत. आता कोमलने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तिने सुनिता अहूजाला चांगलेच सुनावले आहे. तिने लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.

3 / 5

कोमल राणीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला पोस्ट शेअर केली आहे. ‘जी बाई आपल्याच नवऱ्याला वर्षानुवर्षे जिवे मारण्याचा प्रयत्न करत असेल, अशा बायकांचे शाप कोणालाही लागत नाही.’

4 / 5

पुढे कोमल राणीने सुनिता अहुजाच्या ‘होमब्रेकर’ या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आधीच तुटलेल्या घराला कोणतीही बाई तोडणारी असू शकत नाही. त्यांनी पुढे लोकांना संपूर्ण परिस्थिती जाणून न घेता कोणाच्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नये अशी विनंती केली.

5 / 5

कोमलने सुनीताला तिचे नाव आपल्या कथित अजेंड्यासाठी वापरू नये अशी विनंतीही केली. तिने असेही म्हटले की त्यांना वाटत नाही की कोणतीही चांगली आणि समर्पित पत्नी आपल्या नवऱ्यासोबत अशा प्रकारचे वर्तन करू शकते. शेवटी तिने प्रत्येक ‘सभ्य’ पुरुषाला ‘चालाक महिलांपासून’ वाचवण्याचीही गोष्ट सांगितली. सध्या सुनीता आहूजाकडून कोमलच्या या ताज्या निवेदनावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us