
द्राक्षं खायला बहुतांश लोकांना आवडते. मधुर चवीच्या या फळाचे सेवन केल्याने अनेक फायदेही मिळतात. द्राक्षांमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात. या फळामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सही भरपूर असतात. द्राक्षे आपला आहार संतुलित ठेवण्यास आणि शरीराची दैनंदिन कार्ये व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात.

द्राक्षामध्ये सोडिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअम, आयर्न (लोह), झिंक आणि फॉस्फोरस यांसारखी पोषक घक अतिशय मुबलक प्रमाणात असतात. K, C, B9 यांसारख्या जीवनसत्त्वांचा खजिना असलेली द्राक्षं ही पूर्णपणे कोलेस्ट्रॉल मुक्त आहेत.

द्राक्षांमध्ये शक्तिशाली अँटी-ऑक्सीडेंट्स असतात. त्यांना पॉलीफेनोल्स असे म्हटले जाते. पॉलीफेन्लसमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात. हे आपल्या त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते आणि त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करते.

त्याशिवाय गळणाऱ्या केसांसाठीही द्राक्षे खूप फायदेशीर आहेत. हे केसांना चमक आणते तसेच केसांचा व्हॉल्यूमही वाढवते.

द्राक्षे