14 हजार कोटींची संपत्ती पण बेकायद कृत्य, महान खेळाडूला पोलिसांकडून अटक

महान गोल्फ खेळाडू टायगर वूड्सला पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केली आहे. त्याच्यावर तीन गुन्हे दाखल केले आहेत. मागच्या पाच वर्षातील हे दुसरं प्रकरण आहे. जेव्हा पोलिसांनी दिग्गज गोल्फरला अटक केलीय.

| Updated on: Mar 28, 2026 | 3:18 PM
1 / 5
जगभरात असे अनेक महान खेळाडू आहेत. ज्यांनी आपल्या खेळाच्या बळावर नाव, पैसा, प्रसिद्धी मिळवली. पण अनेकदा चुकीच्या गोष्टींसाठी चर्चेत राहिले. अमेरिकेतील दिग्गज गोल्फर टायगर वुड्स असच एक नाव आहे. जो पुन्हा एकदा चुकीच्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. (Photo: Getty Images)

जगभरात असे अनेक महान खेळाडू आहेत. ज्यांनी आपल्या खेळाच्या बळावर नाव, पैसा, प्रसिद्धी मिळवली. पण अनेकदा चुकीच्या गोष्टींसाठी चर्चेत राहिले. अमेरिकेतील दिग्गज गोल्फर टायगर वुड्स असच एक नाव आहे. जो पुन्हा एकदा चुकीच्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. (Photo: Getty Images)

2 / 5

50 वर्षाच्या टायगर वुड्सला 27 मार्च रोजी अमेरिकेत फ्लोरिडा येथे झालेल्या रस्ते अपघातानंतर अटक करण्यात आली. वुड्सच्या रेंज रोवर कारने दुसऱ्या कारला धडक दिल्याचा आरोप आहे. वूड्सची गाडी या अपघातात पलटी झाली. (Photo: PTI)

3 / 5

फ्लोरिडाच्या ज्यूपिटर आयलँडवर झालेल्या या घटनेनंतर स्थानिक पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी वूड्सला अटक केली. त्यावेळी तो नशेमध्ये वाटत होता. तपासात त्याने नशा केल्याच आढळलं नाही. पण तो ड्रग्स किंवा अन्य कुठल्या औषधामुळे नशेमध्ये होता का? याची पोलीस चौकशी करत आहेत. (Photo: PTI)

4 / 5

त्याच्याविरुद्ध नशेमध्ये ड्रायव्हिंग, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान आणि नशेच्या चौकशीला नकार दिल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याआधी 2021 साली सुद्धा वूड्सला अपघातानंतर अटक करण्यात आली होती. (Photo: PTI)

5 / 5

टायगर वुड्सची गणना महान गोल्फरमध्येच नाही, तर सर्वात महान खेळाडूंमध्ये होते. त्याशिवाय तो श्रीमंत खेळाडू आहे. फोर्ब्स नुसार, त्याची नेटवर्थ 1.5 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 14,229 कोटी रुपये आहे. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us