
मराठी चित्रपटसृष्टीची फॅशन दिवा अर्थात अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या सोशल मीडियावर नवनवीन अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होतेय.

सण-उत्सवाला ती चाहत्यांना खास अंदाजात शुभेच्छा देखील देते. आज गुढीपाडवा… याच निमित्तानं सईनं काही सुंदर फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ‘गुढीपाडवा’ आणि नवं वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मस्त पारंपारिक लूकमध्ये फोटो शेअर करत तिनं ‘गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !’ असं कॅप्शन या फोटोंना दिलं आहे.

सई मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिनं मराठीतच नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

सई लवकरच ‘मीडियम स्पाइसी’, मिमी, आणि ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.