
गुरु जम्भेश्वर यूनिवर्सिटी ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नोलॉजी हिसार येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया ही सुरू आहे. विशेष म्हणजे तब्बल 40 पदांसाठी ही भरती सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 डिसेंबर 2023 आहे. यापूर्वीच उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हे करावे लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना gjust.ac.in या साईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. लिपिक, लॅब अटेंडंट, वर्क इन्स्पेक्टर आणि इतर अजून काही पदांसाठी ही भरती आहे.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार आहे. दहावी पास ते पदवीधर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

परत एकदा लक्षात ठेवा की, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 डिसेंबर 2023 आहे. यामुळे उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.