
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर अनेक वर्ष डेट केल्यानंतर आता लग्न बंधनात अडकले आहेत.

24 जानेवारीला त्यांचा हा शाही विवाह सोहळा पार पडला.

पुण्याच्या ढेपे वाड्यात पेशवाई पद्धतीनं मिताली आणि सिद्धार्थ विवाहबद्ध झालेत.

पेशवाई पद्धतीनं लग्न झालंय म्हटल्यावर वर-वधू पेशवाई अवतारात दिसते. मिताली आणि सिद्धार्थ प्रचंड सुंदर दिसत होते.

आता सिद्धार्थ आणि मितालीनं आणखी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये दोघंही कमाल दिसत आहेत.