
अभिनेत्री सोनम कपूरनं होळी निमित्त एक सुंदर फोटोशूट केलं आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सोनम तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. तिचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे.

सोनम कपूरला फॅशन दिवा म्हटले जातं. या फोटोशूटमध्ये सोनम अगदी वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे.

होळीच्या दिवशी शेअर केलेल्या या फोटोला सोनमनं कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, '' मला आशा आहे की आमच्या कृतींचा चांगुलपणा नेहमीच जगातील सर्व वाईट गोष्टी जिंकतो. होळीच्या शुभेच्छा. '

सोनम कपूरचा हा ड्रेस फॅशन डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाइन केला आहे. या फोटोमध्ये सोनम मॉडर्न इंडियाची संस्कृती दाखवित आहे.

सोनमनं ब्लॅक बेस श्रग आणि लाल आणि पांढऱ्या रंगाचा फुलांचा पँट कॅरी केला आहे.

सोनमचा हा लूक स्टाईलिस्ट आणि सर्जनशील दिग्दर्शक निखिल मनसता यांनी स्टाईल केला आहे.