
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) त्याच्या कामगिरीमुळे आणि रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असतो. पण आता क्रिकेटर एक वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. आता क्रिकेटरची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे.

हार्दिकने आता लोकप्रियतेच्या यादीत अव्वल असलेल्या दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर आणि रफाल नदाल यांनाही मागे टाकलं आहे. हार्दिक पांड्याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 25.1 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढे फॉलोअर्स गाठणारा हार्दिक जगातील सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे.

हार्दिक याने 25.1 मिलियन फॉलोअर्सचा आकडा गाठल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले आहेत. 'भरभरुन प्रेम देण्यासाठी आभारी आहे. माझ्यासाठी माझा प्रत्येक चाहता खास आहे. तुमच्या सर्वांचे आभार मानतो. तुम्ही मझ्यावर कायम प्रेम केलं आणि मला पाठिंबा दिला.' सध्या हार्दिकची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हार्दिक पांड्या याच्या लोकप्रियता दिवसागणिक वाढत असताना दिसत आहे. इन्स्टाग्रावर राफेल नदाल यांचे १ कोटी ७९ लाख फॉलोअर्स आहेत, तर रॉजर फेडरर याचे १ कोटी १० लाख फॉलोअर्स आहेत. हार्दिक याचे फक्त इन्स्टाग्रामवरच नाही तर, ट्विटरवर देखील ८ कोटी फॉलोअर्स आहेत. तर क्रिकेटरच्या एन्गेजमेंटमध्ये देखील वाढ होत आहे.

हार्दिक पांड्यासोबतच क्रिकेटर विराट कोहली देखील सोशल मीडिया लोकप्रिय आहे. विराट याचे ट्विटरवर 23 कोटी 90 लाख फॉलोअर्स आहेत. हार्दिक टी-२० मध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे आणि वनडेमध्ये टीमचा उपकर्णधार आहे. सध्या सर्वत्र हार्दिक पांड्याच्या लोकप्रियतेची चर्चा रंगत आहे. (All Photo: Instagram/Hardik Pandya)