
क्रिकेटर हार्दिक पंड्या याची एक्स वाईफ नताशा स्टेनकोविक काही महिन्यांपासून इंडस्ट्रीमध्ये एक्टीव्ह दिसत आहे. मुंबईतील जिमच्या बाहेर जेव्हा ती स्पॉट होते तेव्हा चाहते अक्षरश: उसासे टाकतात. या वेळी नताशा एका ब्रँड न्यू कारमध्ये स्पॉट झाली आहे. ही आलिशान कार लँड रोव्हर डिफेन्डर आहे. या कारची किंमती तीन कोटी रुपये आहे.

ऑरेंज कलरच्या या लँड रोव्हर डिफेन्डरमध्ये नताशा आपल्या स्टायलिश राईडला फ्लॉन्ट करताना दिसली. नताशाने चाहत्यांना सांगितले की तिच्याकडे आता नवीन राईड आली आहे. आणि येत्या काही दिवसात ती नव्या कारमध्ये पाहू शकणार आहेत. क्रिकेटर हार्दिक याच्या घटस्फोट घेतल्यानंतर नताशा आता गाडी चालवायला शिकली आहे. या संदर्भात तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.त्यात तिने लिहीलेय की आता मी हळूहळू का होईना पण स्वतंत्र होत आहे.

नताशाची पर्सनल लाईफ कोणापासून लपलेली नाही. स्पॉटलाईटमध्ये हार्दिक सोबत तिची पर्सनल लाईफ नेहमीच राहिली आहे. सर्बियन मॉडेल टर्न एक्टरेस असलेली नताशा आता आपल्या जीवनाला पुन्हा ट्रॅकवर आणत आहे. जेव्हा हार्दिकशी तिने घटस्फोट घेतला तेव्हा ती मनाने कोलमडली होती. एक आव्हानात्मक वर्ष गेल्यानंतर नताशा आता स्वत:च्या इंडीपेन्डेन्सीला एम्ब्रेस करत असून लाईफ एन्जॉय करण्याचा प्रयत्नही करत आहे.

पब्लिकच्या नजरेत हार्दिक आणि नताशाचे रिलेशनशिप खूप चर्चेत राहिले. दोघांनी काही वेळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. साल २०२० मध्ये दोघांनी लग्न केले. त्यांना काही महिन्यात मुलगा अगस्त्य याला जन्म दिला. त्यानंतर साल २०२३ च्या फेब्रुवारीत त्यांनी पुन्हा लग्न केले. हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. दोघांचे ग्रँड वेंडींग चाहत्यात खूप चर्चेत राहिले.

परंतू एक वर्षानंतर दोघांनी आपले रस्ते वेगळे केले. जुलै २०२४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला,काही वेळ आधीपासूनच ते दोघे वेगळे रहात होते. तर सोशल मीडियावर त्यांनी ते वेगळे झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांचा रितसर घटस्फोट झाल्याचे जगाला समजले. नताशाच्या वर्कफ्रंटवर बोलायचे झाले तर सध्या ती कोणत्याही प्रोजेक्टचा हिस्सा नाही. परंतू स्वत:साठी ती काम शोधत आहे. चांगले स्क्रीप्ट मिळाले तर तीने होकार देण्याचा निर्णय घेतला आहे.