छोट्याशा गावातली गूढ विहीर, ही एक गोष्ट न केल्यास प्रत्येक लग्न थेट…अजूनही लोक पाळतात प्रथा!

भारतात असे एक गाव आहे, ज्या गावात गेल्या अनेक वर्षांपासून एका विहिरीला खूपच महत्त्व आहे. कित्येक दशकं झाली तरीही या गावात त्या विहिरीबाबत लोकांमध्ये खूपच वेगळी श्रद्धा आहे. या विहिरीशिवाय लग्न समारंभ होतच नाही.

| Updated on: Apr 14, 2026 | 6:58 PM
1 / 5
भारतात असे एक गाव आहे, ज्या गावात गेल्या अनेक वर्षांपासून एका विहिरीला खूपच महत्त्व आहे. कित्येक दशकं झाली तरीही या गावात त्या विहिरीबाबत लोकांमध्ये खूपच वेगळी श्रद्धा आहे. या विहिरीशिवाय लग्न समारंभ होतच नाही. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

भारतात असे एक गाव आहे, ज्या गावात गेल्या अनेक वर्षांपासून एका विहिरीला खूपच महत्त्व आहे. कित्येक दशकं झाली तरीही या गावात त्या विहिरीबाबत लोकांमध्ये खूपच वेगळी श्रद्धा आहे. या विहिरीशिवाय लग्न समारंभ होतच नाही. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5

न्यूज 18 हिंदीने दिलेल्या रिपोर्टनुसार ही विहीर हरियाणातील फरिदाबाद येथील सिही गावात आहे. ही विहीर म्हणजे आमची ओळख आहे, अशी भावना तेथील लोकांमध्ये आहे. काळानुसार गाव बदललं, लोक बदलले परंतु या विहिरीचे महत्त्व काही कमी झाले नाही. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5

आता ही विहीर आटली आहे. ती मोडकळीसही आलेली आहे. म्हणूनच या विहिरीचा जीर्णोद्धार होणे गरजेचे आहे, अशी भावना तेथील लोक व्यक्त करतात. त्या गावात लग्न, बारसं किंवा अन्य कोणताही समारंभ याच विहिरीच्या आजूबाजूला होतो. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5

कोणताही शुभ कार्यक्रम असेल तर याच विहिरीच्या शेजारी तो केला जातो. विहिरीत पाणी नसले तिरीही तिला तेवढेच महत्त्व आहे. फरिदाबाद येथील तिगांव येथील अशाच एका ऐतिहासिक विहिरीचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5

अगदी तशाच पद्धतीने आमच्याही गावातील विहिरीची डागडुजी करावी, अशी मागणी तेथील गावकरी व्यक्त करत आहेत. काहीही झालं तरी ही विहीर वाचली पाहिजे, ती आमची ओळख आहे, अशी भावना तेथील लोकांची आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us