
चिपळूण तालुक्यातील 'वहाळ' गावातील मोरेवाडीत मोरे यांचे घर आहे. मोरे गणपतीला आले की संपूर्ण वाडी आणि गावकरी मित्र मोरे यांच्या घरी गणपती उत्सवाला असतात. लहान मोठ्यांसह संपूर्ण मोरे भावकी आरतीसाठी एकत्र असते.

प्रभाकर मोरे याच मातीतून मोठे झाले आणि मुंबईत जाऊन कला जोपासत पुढे स्टार कलाकार झाले. प्रभाकर मोरे यांचा संघर्ष ज्या गावामधून सुरू झाला. ज्या मित्रांमुळे प्रभाकर मोरे पुढे गेले या लहानपणाच्या सगळ्या गमती जमती आणि कला जोपासता आली.

कला जोपासताना असलेला संघर्ष प्रभाकर मोरे यांच्यासह त्यांच्या मित्रांनी आणि परिवाराने सांगितल्या.आपल्या मित्रांमुळे पुढे गेल्याचा प्रभाकर मोरे सांगतात... कुठे असलो तरी दरवर्षी कोकणच्या आपल्या गणपतीला पण येत असतो.

लहानपणी मित्रांनी दिलेली साथ यामुळे मी इथपर्यंत जाऊ शकलो लहानपणापासूनच कलेचा छंद जोपासला. खिशात पैसे नसताना देखील खैर झाडें चोरून पैसे मिळवून केलेला प्रवास मोरे यांचे मित्र सांगतात...

लहानपणीचे किस्से मोरे यांच्या मित्रांनी सांगितले... तर घरातील भावंडांनीदेखील... लहानपणापासून कलेचा छंद जोपासला यामुळे भविष्यातली पिढी देखील कलेकडे वळवण्यासाठी प्रयत्न गावांमध्ये चालू आहे.