
ताजमहाल पाहायाला कोणाला नाही आवडणार? लाखो पर्यंटक त्याचे सौंदर्य पाहायला जात असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की रात्रीचा ताजमहल कसा दिसत असेल? कसं असेल त्याचं सौंदर्य? हे फोटो पाहून तुम्हाला नक्कीच स्वप्न पाहत असल्यासारखं वाटेल.

दिवसा ताजमहालच्या पांढऱ्या संगमरवराचे सौंदर्य सर्वांनाच दिसते. पण जेव्हा रात्रीच्या चांदण्यात ताजमहल पाहण्याचं सुख काही औरच आहे. रात्री त्याचे स्वरूपच बदलते असं वाटतं. लख्ख चांदण्यांचा संगमरवरावर पडणारा प्रकाश आणि त्याच्या समोर असलेल्या यमुनेच्या पाण्यात दिसणारी चांदण्याची लखलख एखाद्या स्वप्नातील जगापेक्षा कमी वाटत नाही.

रात्रीचे सर्वात सुंदर दृश्य म्हणजे ताजमहालच्या भिंतींवर चांदण्याचा प्रकाश पडतो ते. त्या प्रकाशात त्याचे सौंदर्य काही वेगळेच दिसते. हे दृश्य ते एखाद्या परीकथेसारखे भासवते.

रात्रीच्या शांततेत, यमुना नदीच्या पाण्यात ताजमहालचे प्रतिबिंब एका आरशासारखे दिसते. जणू तो पांढराशुभ्र पौर्णिमेचा चंद्राचीच छबी आहे. ताऱ्यांमध्ये चमकणारा ताजमहाल पाहून डोळ्यांना विश्वास बसत नाही. ते दृश्य खरोखरंच डोळ्यांना सुखावणारं असतं.

जेव्हा ताजमहाल रात्रीच्या विशेष प्रकाशात चमकतो तेव्हा त्याचे कोरीव काम आणि संगमरवरी तपशील आणखी स्पष्ट दिसतात. रात्रीच्या प्रकाशात चमकणाऱ्या त्याच्या भिंती त्याचे सौंदर्य अजून वाढवतात.

रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही ताजमहालला त्याच्या बागेतून पाहता तेव्हा आजूबाजूला असलेली शांतता आणि मध्यभागी उभे असलेले ते स्मारक मनाला शांततेची भावना देते. ती शांतता जसं कोणत्याही मेडीटेशनपेक्षा कमी वाटत नाही

या अंधारात फक्त ताजमहलच नाही तर त्याच्या आजूबाजूला उभे असलेले मिनार देखील ताजमहालचे सौंदर्य वाढवतात. ताजमहालची सोनेरी आभा तर पाहण्यासारखी असते. चंद्रप्रकाश आणि त्यातील प्रकाशाच्या संयोगामुळे, कधीकधी ताजमहालवर सोनेरी आभा दिसते. जी त्याला एक सोनेरी असे जादुई रूप देते.

रात्रीच्या शांततेत ताजमहाल पाहण्यासाठी येणाऱ्या जोडप्यांसाठी, हे ठिकाण म्हणजे खरोखरच प्रेमाचं प्रतिक काय असावं याची जाणीव करून देईल. जेव्हा सूर्य पूर्णपणे मावळतो तेव्हा ताजमहाल हळू हळू त्या आकाशातील ताऱ्यांमध्ये एकरूप झाल्यासारखा वाटतो. हे दृश्य ज्यांनी अनुभवलं आहे त्यांच्यासाठी ते कधीही न विसरणारं आहे.