
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी, मँगनीज, फोलेट आणि पोटेशियम मुबलक प्रमाणात आहे. तसेच स्ट्रॉबेरीमध्ये एंटीऑक्सिडेंट्ससुद्धा असतात. यामुळे आरोग्य अधिक चांगले राहते. प्रसिद्ध न्यूट्रीशनिस्ट निखिल वत्स यांनी हा फळ सेवन करण्याचे फायदे सांगितले.

स्ट्रॉबेरीमध्ये फायबर, फ्लेव्होनॉइड्स आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदयासाठीही फायदेशीर मानले जातात.

स्ट्रॉबेरी व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते. परिणामी व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यास आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते. तुमच्या आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करून तुम्ही अनेक आजार टाळू शकता.

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्ससारखे इतर पोषक घटक आहे. ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. स्ट्रॉबेरीचे नियमित सेवन केल्याने वय-संबंधित मॅक्युलर डिजनरेशनचा धोका कमी होतो आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

स्ट्रॉबेरीमध्ये खूप कमी कॅलरीज आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. तुम्ही एक स्ट्रॉबेरी खाल्ली तरी जास्त वेळ भूक लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला वजनावर हळूहळू नियंत्रण मिळवता येईल. हे नियमित खाल्ल्याने तुमची फिटनेसही चांगले राहील.