AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : 2 मालिका-6 सामने, बांगलादेश दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर, पहिली मॅच केव्हा?

Bangladesh Tour 2026 : आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा थरार सुरु असताना न्यूझीलंड क्रिकेट टीम बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभयसंघात एकूण 2 मालिकांमध्ये 6 सामने खेळवण्यात येणार आहेत.

Cricket : 2 मालिका-6 सामने, बांगलादेश दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर, पहिली मॅच केव्हा?
India vs New Zealand CricketImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 17, 2026 | 5:11 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता काही आठवडे द्विपक्षीय मालिकांचा थरार पाहायला मिळत आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अवघ्या काही दिवसांपूर्वी बांगलादेशने मायदेशात पाकिस्तानचा एकदिवसीय मालिकेत धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय मिळवला. आता 28 मार्चपासून आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा थरार रंगणार आहे. अशात मोठी अपडेट समोर आली आहे. साधारणपणे आयीपएल स्पर्धेदरम्यान आंतरराष्ट्रीय मालिकांचं आयोजन केलं जात नाही. मात्र या 19 व्या हंगामादरम्यान 2 संघ भिडणार आहेत. या 2 संघांमध्ये 2 मालिका खेळवण्यात येणार आहेत. याबाबत आपण जाणून घेऊयात.

बांगलादेश आणि न्यूझीलंड आयपीएलच्या 19 व्या हंगामादरम्यान एकमेकांविरुद्ध 2 मालिकांमध्ये एकूण 6 सामने खेळणार आहे. या दोन्ही मालिकांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. न्यूझीलंड क्रिकेट आणि आयसीसीकडून याबाबतची माहिती देण्यात आल आहे. न्यूझीलंड क्रिकेट टीम या मालिकांसाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंडच्या बांगलादेश दौऱ्याची सुरुवात ही वनडे सीरिजने होणार आहे. वनडे सीरिजचा थरार 17 ते 23 एप्रिल दरम्यान रंगणार आहे. तर 27 एप्रिल ते 2 मे दरम्यान टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे.

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड

बांगलादेशच्या खेळाडूंना यंदा 19 व्या मोसमासाठी प्रवेश नाहीय. बांगलादेशमधील वाढत्या संघर्षानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे बांगलादेशचा प्रमुख संघ मायदेशातील मालिकेसाठी सज्ज असणार आहे. तर न्यूझीलंडची बी टीम बांगलादेश दौऱ्यासाठी रवाना होऊ शकते.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 17 एप्रिल, मीरपूर

दुसरा सामना, 20 एप्रिल, मीरपूर

तिसरा सामना, 23 एप्रिल, चटगाव

न्यूझीलंडचा बांगलादेश दौरा

मिळालेल्या माहितीनुसार, न्यूझीलंड बांगलादेश दौऱ्यासाठी वनडे सीरिजच्या 4 दिवसांआधी पोहचणार आहे. किवी 13 एप्रिलला बांगलादेशमध्ये पोहचणार आहेत.

टी 20i मालिकेचा थरार

पहिला सामना, 27 एप्रिल, चटगाव

दुसरा सामना, 29 एप्रिल, चटगाव

तिसरा सामना, 2 मे, ढाका

न्यूझीलंडच्या बांगलादेश दौऱ्याचं वेळापत्रक

न्यूझीलंड सध्या कुठेय?

दरम्यान टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभवानंतर न्यूझीलंड क्रिकेट टीम मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20i मालिका खेळत आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20i सामने होणार आहेत. ही मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. दक्षिण आफ्रिकेने मालिकेत विजयी सुरुवात केली. त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक करत बरोबरी साधली. आता तिसऱ्या सामन्यात कोण मैदाना मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल