Health care: थंडीच्या दिवसात शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून या फळाचे सेवन अवश्य करा सेवन…

| Updated on: Feb 08, 2022 | 12:14 AM

Health care: जर आपण जास्तीत जास्त पाणी(Drink water tips) प्यायले तर शरीरातील अनेक आजार दूर होण्यास मदत होते परंतु अनेकदा थंडीच्या(winter) दिवसांमध्ये आपण कमी पाणी पितो. पाणी कमी प्यायल्याने आपल्या शरीराला अनेक समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही पाणी पीत नसाल तर अशा वेळी पाण्याची कमतरता पण अन्य घटकांद्वारे पूर्ण करू शकतो, चला तर मग जाणून घेवूयाअशा काही फळांविषयी जे तुमचे शरीर हाइड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात.

1 / 5
नारळ पाणीः असे म्हटले जाते की, दिवसभरातून तुमच्याकडून जास्त पाणी प्यायले गेले नाही तर अशा वेळी व्यक्तीने दिवसभरातून एकदा तरी नारळाचे पाणी (coconut water) आवश्यक प्यायला पाहिजे. नारळच्या पाण्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नारळाचे पाणी प्यायल्याने आपले शरीर( human body) हायड्रेट( hydrate) राहते आणि सोबतच अनेक आजारांपासून शरीराला लांब ठेवते म्हणून प्रत्येकाने नारळ पाणी अवश्‍य सेवन करायला हवे.

2 / 5
पालकः असे म्हटले जाते की,पालक भाजी मध्ये 92 टक्के पेक्षा जास्त पाण्याची मात्रा असते आणि त्याचबरोबर या पालकमध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त राहते.पालकच्या भाजी मध्ये उपलब्ध असणारे विटामिन , मिनरल मुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते म्हणूनच आपल्यापैकी आणि प्रत्येकाने पालक भाजी चे सूप अवश्‍य सेवन करायला हवे आणि आपले शरीर नेहमी हाइड्रेट ठेवायला पाहिजे.

3 / 5
जर आपण नियमितपणे टमाटर सेवन केले तर तुमचे शरीर दीर्घकाळापर्यंत हायड्रेट राहील. टमाटर मध्ये 94 टक्के पेक्षा जास्त पाण्याची मात्रा उपलब्ध असते तसेच यामध्ये उपलब्ध असणारे एंटीऑक्सीडेंट गुणधर्म तुमच्या शरीराला निरोगी राहण्यास मदत करतात तुम्ही टमाट्याचे सलाड किंवा ज्यूस सुद्धा बनवून खाऊ पिऊ शकता.

4 / 5
आपल्यापैकी प्रत्येक जण दिवसभरातून एकदा तरी दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ खात असतो. तसे पाहायला गेले तर दुधामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच प्रत्येकाने दिवसभरातून एक ग्लास दूध अवश्‍य सेवन करायला हवे, असे केल्याने तुमचे शरीर फिट राहण्यासाठी मदत होते तसेच दुधामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम मॅग्नेशियम या सारखे गुणधर्म उपलब्ध असल्याने आपल्या शरीरातील हाडांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते.

5 / 5
केळी मध्ये पोटॅशियम मिनरल्स आणि अन्य घटक उपलब्ध असतात, जे आपल्या शरीरात इलेक्ट्रोलाइट्स रूपात कार्य करतात. या इलेक्ट्रोलाइट्सच्या मदतीने आपण आपले शरीर हायड्रेट ठेवू शकतो.