
बीट आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असून बीटचा दररोजच्या आहारात समावेश केला तर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. त्वचेसाठी सर्वात फायदेशीर बीट आहे.

दररोज बीट खाण्याचा जवळपास सर्वांनाच कंटाळा येतो. कच्चे बीट खायचे म्हटल्यावर सर्वजण नकोच म्हणतात. दररोज सकाळी तुम्ही मस्त खमंग असा बीटचा चिल्ला बसून खाऊ शकता.

यासाठी भांड्यात बेसन, हळद, मीठ, जिरे आणि इतर मसाले घाला आणि चांगले मिसळा. एक छोट्या आकाराचे बीट मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

त्यानंतर ते बेसन आणि इतर मसाल्यांमध्ये मिक्स करा. दोसा तयार करण्यासाठी जसे आपण पीठ तयार करतो, तसे सेम करा आणि मस्त चिला तयार करा.

जर तुम्हाला वाटले तर वरून तुम्ही यावर पनीर देखील बारिक करून टाकू शकता. हे अत्यंत पाैष्टीक असा पदार्थ तुमचा तयार होईल. विशेष म्हणजे तुम्ही हे दररोज खाऊ शकता.