फक्त एका वाक्यामुळे हेमा मालिनी बनल्या चाहत्यांच्या ड्रीम गर्ल, काय होतं ते वाक्य? वाचून…

फक्त एका वाक्याने हेमा मालिनी यांना बनवलं होतं ड्रीम गर्ल. नेमकं काय होतं ते वाक्य? ज्यामुळे आजही त्यांना ड्रीम गर्ल म्हणून ओळखतात लोक.

| Updated on: Jul 06, 2026 | 1:34 PM
1 / 5
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अभिनयासोबतच राजकारणातही यशस्वी कारकीर्द घडवली आहे. मात्र, अनेकांना हे माहीत नाही की त्यांची पहिली आवड अभिनय नव्हती, तर शास्त्रीय नृत्य होती. त्या व्यावसायिक नृत्यांगना म्हणून स्वतःची ओळख निर्माण करू इच्छित होत्या.

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अभिनयासोबतच राजकारणातही यशस्वी कारकीर्द घडवली आहे. मात्र, अनेकांना हे माहीत नाही की त्यांची पहिली आवड अभिनय नव्हती, तर शास्त्रीय नृत्य होती. त्या व्यावसायिक नृत्यांगना म्हणून स्वतःची ओळख निर्माण करू इच्छित होत्या.

2 / 5

मात्र, त्यांच्या आईने त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि आपल्या सौंदर्य, अभिनय आणि व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली.

3 / 5

1968 मध्ये प्रदर्शित झालेला 'सपनों का सौदागर' हा हेमा मालिनी यांचा हिंदीतील पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत दिग्गज अभिनेते राज कपूर प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटाचे निर्माते बी. अनंत स्वामी हे चित्रपटाची प्रसिद्धी अधिक प्रभावी करण्यासाठी वेगळ्या प्रचार मोहिमेच्या शोधात होते.

4 / 5

याच वेळी त्यांनी हेमा मालिनी यांच्या फोटोखाली "Dream Girl Coming to Town" ही आकर्षक टॅगलाइन वापरली. ही केवळ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आखलेली प्रचार मोहीम होती. मात्र, या एका कल्पनेने इतिहास घडवला.

5 / 5

'सपनों का सौदागर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. तरीही या प्रचार मोहिमेमुळे माध्यमे आणि चाहत्यांनी हेमा मालिनी यांना 'ड्रीम गर्ल' या नावाने हाक मारण्यास सुरुवात केली. कालांतराने हेच नाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी इतके एकरूप झाले की आजही त्या 'ड्रीम गर्ल' म्हणूनच सर्वत्र ओळखल्या जातात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us