
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र हे सध्या चर्चेत आहेत. 31 ऑक्टोबर रोजी नियमित तपासणीसाठी ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. धर्मेंद्र यांच्या पत्नी, अभिनेत्री हेमा मालिनी देखील रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, धर्मेंद्र यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या पैकी कोणाची संपत्ती जास्त असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

आता 76 वर्षांच्या असलेल्या हेमा मालिनी कायम चर्चेत राहिल्या आहेत. धर्मेंद्र यांच्याबरोबरची त्यांची प्रेमकहाणी आजही चर्चेत आहे. त्यांची पहिली भेट ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘आसमान महल’ चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान झाली होती, पण त्यांचा संबंध ‘शोले’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अधिक दृढ झाला. 1980 मध्ये त्यांचा विवाह झाला.

2024 मध्ये हेमा मालिनी यांनी एका प्रतिज्ञापत्रात आपली एकूण संपत्ती 142 कोटी रुपये असल्याचे सांगितले. त्यांची संपत्ती सिनेमांमध्ये काम करुन, काही जाहिरातींसाठी काम करुन मिळवली असल्याचे म्हटले जाते. तसेच या संपत्तीचा आकडा 2025मध्ये वाढला असल्याचे म्हटले जात आहे.

1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटाने धर्मेंद्र यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी 300 पेक्षा जास्त चित्रपटांत काम केलं आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार 2024 पर्यंत त्यांची एकूण संपत्ती सुमारे 450 कोटी रुपये आहे.

हेमा मालिनी यांची संपत्ती 142 कोटी रुपये आहे तर धर्मेंद्र यांची संपत्ती 450 कोटी रुपये आहे. हेमा मालिनीपेक्षा धर्मेंद्र यांची संपत्ती जास्त असल्याचे म्हटले जाते. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच दोघांच्या मुलांचीही संपत्ती कोट्यावधी रुपयांमध्ये असल्याचे म्हटले जाते.