
बॉलीवूड इंडस्ट्रीत असंख्य चित्रपटांची निर्मिती होत असते. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या इंडस्ट्रीमध्येच अशा अनेक कथा आहेत ज्या एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाहीत. अशीच एक कहाणी म्हणजे अभिनेत्री दिया मिर्झा हिची आहे. तिचं आयुष्य चर्चेत असतं, तिच्याबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना खूप उत्सुकता असते.

दिया मिर्झा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे, रहना है तेरे दिल में मधून मोठ्या पडद्यावर आलेल्या दियाने गेल्या अनेक वर्षात बहुसंख्य चित्रपटात काम केलं. तिचे लाखो चाहते आहेत. तिचं हास्य, सौंदर्य हे कित्येक जणांना भुरळ पाडतं. सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय असते, विविध फोटो, व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट्स देत असते.

या अभिनेत्रीची कारकीर्द बऱ्यापैकी यशस्वी झाली असली. तशीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. ती समस्या तिच्या मुस्लिम आडनावाची होती. त्यामुळे बरीच चर्चाही झाली.

खरंतर, दिया मिर्झा हिची आई हिंदू तर तिचे वडील ख्रिश्चन होते, पण तरीही ती मिर्झा हे आडनाव लावते. त्यामुळे तिचं मुस्लिम आडनाव ऐकून अनेक लोकांचा गोंधळ उडतो. आई हिंदू आणि वडील ख्रिश्चन असतानाही दिया तिच्या नावापुढे मुस्लिम आडनाव का लावते ? असा प्रश्न अनेकांना पडायचा.

याबाबतची खरी माहिती अशी की, दिया खूप लहान होती तेव्हाच तिचे आई-वडील विभक्त झाले. त्यानंतर दिया हिच्या आईने हैदराबादमधील मुस्लिम व्यक्ती अहमद मिर्झा यांच्याशी लग्न केलं.

मात्र बऱ्याच कालावधीनंतर दिया ही तिच्या सावत्र वडिलांच्या खूप निकट आली. त्यांचा खास बाँड होता. त्यामुळे जेव्हा दियाने मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला तेव्हा तिने तिच्या नावापुढे मिर्झा हे आडनाव जोडले. म्हणूनच ती दिया मिर्झा या नावाने ओळखली जाऊ लागली.