AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tapovan Tree Cut : मोठी बातमी, पर्यावरण प्रेमी चिडले, नाशिकच्या तपोवनमध्ये 300 झाडं तोडली, वृक्ष तोडीला सुरुवात, VIDEO

मागच्या अनेक दिवसांपासून या वृक्ष तोडीला पर्यावरण प्रेमी विरोध करत आहेत. पण सरकारने आजपासून ही वृक्षतोड सुरु केली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Tapovan Tree Cut : मोठी बातमी, पर्यावरण प्रेमी चिडले, नाशिकच्या तपोवनमध्ये 300 झाडं तोडली, वृक्ष तोडीला सुरुवात, VIDEO
Tapovan Tree Cut
| Edited By: | Updated on: Dec 11, 2025 | 12:19 PM
Share

नाशिकच्या तपोवनमध्ये वृक्ष तोडीला सुरुवात झाली आहे. नवीन एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. पर्यावरणप्रेमींचा विरोध डावलून ही वृक्षतोड करण्यात येत आहे. 2027 साली नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी देशभरात लाखो साधू, संत आणि भाविक नाशिकमध्ये एकवटतील. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवनमध्ये साधुग्राम बांधण्याची योजना आहे. या साधुग्रामसाठी तपोवनमधील जवळपास 1800 झाडं तोडावी लागणार आहेत. पर्यावरणप्रेमींचा या वृक्षतोडीला विरोध आहे. पण सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनला भेट देऊन वृक्ष तोडीला विरोध केला. या मुद्यावर ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुद्धा भेटले.

मागच्या अनेक दिवसांपासून या वृक्ष तोडीला पर्यावरण प्रेमी विरोध करत आहेत. पण सरकारने आजपासून ही वृक्षतोड सुरु केली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. साधुग्रामच्या 1800 झाडांचा प्रश्न अनुत्तरित असताना एसटीपी प्लांटसाठी झाडांची कत्तल केल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात नवीन एसटीपी प्लांट उभारण्यात येणार आहे.

रोख रक्कमेचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी धुडकावला

याच प्रकल्पासाठी झाडांची कत्तल केल्याचा आरोप आहे. 447 झाडांना तोडण्याची रीतसर परवानगी असल्याचा पालिका प्रशासनाचा दावा आहे. तपोवन परिसरात उभारला जाणारा नवीन एसटीपी प्लांट वादात सापडला आहे. तपोवनातील साधुग्रामसाठी टीडीआरद्वारे भूसंपादनास शेतकऱ्यांचा ठाम विरोध. बाजारभावानुसार फक्त रोखीने मोबदला देण्याची जागामालक आणि शेतकऱ्यांची मागणी. महापालिकेचा 50 टक्के टीडीआर आणि 50 टक्के रोख रक्कमेचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी धुडकावला. आरक्षण 377 एकरांवरून 1200 एकरांपर्यंत वाढवण्यालाही शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्याकडून वाटाघाटींचे आश्वासन.

नाशिकसाठी आज येणार 15000 झाडं

हैदराबाद वरून नाशिकसाठी आज येणार 15000 झाडं. आलेल्या झाडांच्या रोपांसाठी पर्यावरण प्रेमी आणि महापालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी सुरू. पेलिकन पार्क आणि गंगापूर रोड व्यतिरिक्त गोदावरी, नंदिनी,कपिला नद्यांच्या तीरावर देखील जागांचा शोध सुरू. नद्यांच्या किनाऱ्यावर आलेल्या झाडांचे रोपण झाल्यास पर्यावरण राखण्यास मदत होईल असा पर्यावरण प्रेमींचा दावा. महापालिका वन विभागाचे अधिकारी, पर्यावरण प्रेमी यांची संयुक्त पाहणी सुरू.

मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.
अपघातात अजित पवार यांचा मृत्यू, रूपाली ठोंबरेंना अश्रु अनावर
अपघातात अजित पवार यांचा मृत्यू, रूपाली ठोंबरेंना अश्रु अनावर.
अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!
अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!.
अजित पवारांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी शारदा प्रांगणात ठेवण्यात येणार
अजित पवारांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी शारदा प्रांगणात ठेवण्यात येणार.
अजित पवार अकाली निधन; शरद पवार, प्रतिभा पवार बारामतीत
अजित पवार अकाली निधन; शरद पवार, प्रतिभा पवार बारामतीत.
अजित पवारांचे निधन; सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे बारामतीत दाखल
अजित पवारांचे निधन; सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे बारामतीत दाखल.