Raj Thackeray : राज ठाकरे यांची ठाणे रेल्वे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?
राज ठाकरे आज 2008 च्या मनसे आंदोलनाशी संबंधित सुनावणीसाठी ठाणे रेल्वे न्यायालयात हजर राहणार आहेत. कल्याण स्थानकावरील हिंसेप्रकरणी त्यांच्यावर आरोप आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 2008 मधील मनसे आंदोलन प्रकरणी ठाणे रेल्वे न्यायालयात सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहणार आहेत. परप्रांतीय रेल्वे भरती प्रकरणावरून मनसेने केलेल्या आंदोलनावेळी कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाणीसह स्टेशनचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्याचा मनसेने आरोप केला होता. राज ठाकरे यांच्यावर परप्रांतीयांना लक्ष्य करून हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा ठपका असून, या प्रकरणात त्यांना अटकही करण्यात आली होती. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास राज ठाकरे न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे.
Published on: Dec 11, 2025 11:09 AM
Latest Videos
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर

