म्हाला पण रेफ्रिजरेटरच्या वर पैसे ठेवण्याची सवय आहे का? मग हे वाचाच, अन्यथा मोठ्या संकटाला जावं लागेल सामोरं
स्वयंपाकघरातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेफ्रिजरेटर. वास्तूशास्त्रात रेफ्रिजरेटरबद्दल अनेक गोष्टी, नियम सांगितले आहेत. त्यातीलच एक म्हणजे फ्रिजवर पैसे किंवा इतर वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात आर्थिक नुकसान होऊ शकते. चला जाणून घेऊयात की, पैशांसह कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या फ्रिजच्यावर अजिबात ठेवू नये.

वास्तुशास्त्रात घराच्या प्रत्येक कोपऱ्याशी संबंधित नियम सांगितले गेले आहेत. वास्तुच्या नियमांचे पालन केल्यास जीवनातील अर्ध्या समस्या दूर होऊ शकतात. जर घरात काही वास्तुदोष असेल तर ती निश्चितच प्रत्येक सदस्याच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करते. अशा परिस्थितीत काही गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. घराचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्वयंपाकघर. वास्तूशास्त्रात स्वयंपाकघराबाबत तर बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. स्वयंपाकघराच्या दिशेपासून प्रत्येक वस्तूंची दिशी, तसेच भांडी अशा अनेक गोष्टींबद्दल सांगण्यात आलं आहे.
स्वयंपाकघरातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेफ्रिजरेटर
स्वयंपाकघरातील अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेफ्रिजरेटर. लोक अनेकदा लहान वस्तू , रेफ्रिजरेटरवर ठेवतात जेणेकरून त्यांना वेळेत त्या मिळू शकतील. किंवा शोभेच्या वस्तू तरी ठेवतात. एवढंच नाही तर किराणा सामान आणि भाज्या खरेदी केल्यानंतर उरलेले पैसे, किंवा पटकन सुट्टे पैसे मिळावे यासाठी देखील रेफ्रिजरेटरवर असेच ठेवून देतात. पण तसे करणे योग्य मानले जात नाही.त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. यासाठी कोणते वास्तु नियम लागू होतात ते जाणून घेऊयात.
फ्रिजवर पैसे ठेवण्याचे तोटे
शास्त्रांनुसार, आपण कधीही रेफ्रिजरेटरमध्ये नाणी आणि नोटा ठेवू नयेत. खरं तर, शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की हे पैसे साठवण्यासाठी योग्य ठिकाण नाही. शास्त्रांनुसार, या ठिकाणी पैसे ठेवल्याने मोठे नुकसान होऊ शकते आणि त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकू शकतात. ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने आर्थिक कल्याणावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. हळूहळू, घरातील सर्व सदस्यांना आर्थिक नुकसान होऊ शकते. शिवाय, असे केल्याने मानसिक शांती देखील भंग होऊ शकते.
या गोष्टी फ्रिजच्यावर अजिबात ठेवू नका
आता आपण जाणून घेऊया की पैशांव्यतिरिक्त इतर कोणत्या गोष्टी रेफ्रिजरेटरच्या वर ठेवू नयेत. शास्त्रांनुसार, पाण्याने भरलेले भांडे, मत्स्यालय, धातूच्या वस्तू आणि औषधे कधीही रेफ्रिजरेटरवर ठेवू नयेत. काही लोक रेफ्रिजरेटरवर सजावटीच्या वस्तू देखील ठेवतात, परंतु हे टाळले पाहिजे. रेफ्रिजरेटरच्या वर या वस्तू ठेवल्याने घराच्या वास्तुवर नकारात्मक परिणाम होतो. म्हणून, रेफ्रिजरेटरचा वरचा भाग नेहमी मोकळा ठेवणं चांगले.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
