फ्रीजवर चुकूनही ठेवू नका या गोष्टी, अन्यथा आरोग्यावर होईल नकारात्मक परिणाम
वास्तुशास्त्रानुसार रेफ्रिजरेटरच्या वर वस्तू ठेवल्याने घराच्या आर्थिक परिस्थितीवर, आरोग्यावर आणि मानसिक शांतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तर रेफ्रिजरेटरच्या वर कोणत्या गोष्टी ठेवणे टाळावे हे आपण आजच्या लेखातून जाणून घेऊया.

आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण घरात शांती, आरोग्या आणि त्याबरोबरच समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार सल्ल्यांचा पाळण करत असतो. खरंतर घरातील प्रत्येक वस्तू एक विशिष्ट ऊर्जा निर्माण करतात. तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हा आपल्या घराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. आजकाल प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात रेफ्रिजरेटर हे असतेच कारण ही एक अत्यावश्यक गरज मानली जाते. रेफ्रिजरेटरचा वापर आपण सामान्यतः अन्न, भाज्या आणि फळे ताजे राहावे व जास्त दिवस चांगले राहतील. यासाठी वापर केला जातो.
पण वास्तुशास्त्रानुसार रेफ्रिजरेटरच्या या काही गोष्टीमुळे आपल्या घराच्या वास्तुलाही नुकसान पोहोचू शकतो. खरं तर बरेच लोकं रेफ्रिजरेटरच्या वर लहानमोठ्या वस्तू ठेवतात जेणेकरून त्या आपल्याल लगेच मिळतील, पण वास्तुनुसार योग्य मानले जात नाही. असे म्हटले जाते की रेफ्रिजरेटरच्या वरच्या भागात काही वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मकता येते. चला रेफ्रिजरेटरच्या वर कोणत्या गोष्टी ठेवणे टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात.
धातूच्या वस्तू
बरेचं लोकं रेफ्रिजरेटरच्या वर धातूच्या वस्तू किंवा ट्रॉफी ठेवतात. तथापि, वास्तुनुसार अशा वस्तु ठेवणे देखील अयोग्य मानले जाते. असे केल्याने घराच्या उर्जेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक आणि मानसिक समस्यांचा धोका वाढू शकतो.
सजावटीच्या वस्तू
आपल्यापैकी अनेकजण स्वयंपाकघरात असलेलं रेफ्रिजरेटर सुंदर दिसावे यासाठी त्याच्या वर फुलांचा गुच्छ किंवा बांबूचे रोप ठेवतात, परंतु वास्तुनुसार हे योग्य नाही. अशा वस्तू ठेवल्याने घरातील सकारात्मक उर्जेचा भंग होतो आणि सौभाग्य कमी होऊ शकते असे मानले जाते. म्हणून रेफ्रिजरेटरच्या वर वनस्पती किंवा सजावटीच्या फुलदाण्या ठेवणे टाळणे उचित आहे.
औषधं
लोकं अनेकदा औषधे रेफ्रिजरेटरच्या वर ठेवतात. कारण ती सहज मिळतील म्हणून ठेवतात. परंतु वास्तुनुसार रेफ्रिजरेटरच्या वर औषधं ठेवणे पूर्णपणे अयोग्य मानली जाते. असे मानले जाते की औषधे रेफ्रिजरेटरच्या वर ठेवल्याने घरात आजार आणि तणावाचे वातावरण निर्माण होते, म्हणून ते तेथे ठेवणे टाळावे.
एकुणच रेफ्रिजरेटच्या वर कोणत्याही वस्तू ठेवताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. योग्य वास्तु नियम पाळले तर घरात सुख-शांती, आरोग्य आर्थिक स्थैर्य आणि एकोपा टिकून राहतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
