AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kirit Somaiya :  कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... मुंबई भाजपच्या नेत्यांवर समोय्यांची नाराजी? बड्या नेत्यावरच निशाणा

Kirit Somaiya : कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद… मुंबई भाजपच्या नेत्यांवर समोय्यांची नाराजी? बड्या नेत्यावरच निशाणा

| Updated on: Dec 11, 2025 | 11:50 AM
Share

किरीट सोमय्यांनी मुंबई भाजपच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करत महापौरपदाच्या महत्त्वाकांक्षेबाबत सवाल उपस्थित केले. कसली कॉलर टाईट आणि कसलं महापौरपद, या नेत्यांना आवरा, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत विनंती केल्याचे सांगितले. सोमय्यांनी उद्धव ठाकरे सेनेवर कोविड काळात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे गंभीर आरोपही केले आहेत.

भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी मुंबई भाजपच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करत महापौरपदाच्या महत्त्वाकांक्षेबाबत थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कसली कॉलर टाईट आणि कसलं महापौरपद, या नेत्यांना आवरा, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत विनंती केल्याचे सांगितले. महापौरपद मिळाल्यावर कॉलर टाईट होईल असे म्हणणाऱ्यांना आवर घालण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या मते, भाजप महापौरपदासाठी लढत नाही, पण माननीय देवाभाऊ महानगरपालिकेत शपथ घेण्यासाठी गेल्यास सर्वांची कॉलर टाईट होईल.

सोमय्यांनी यावेळी उद्धव ठाकरे सेनेवरही जोरदार हल्ला चढवला. कोविड-१९ महामारीच्या काळात ठाकरे सेनेने कोविडमधून कमाई केली, ४० हजार रेमडेसिवीर मातोश्रीवर जात होते आणि खिचडीचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईला ३५ वर्षांच्या ठाकरे सेनेच्या लुटीतून आणि दरोडेखोरीतून बाहेर काढून गरिमामयी बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सोमय्यांच्या या वक्तव्यांवरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात असताना, सुधीर मुनगंटीवार यांना याबाबत विचारले असता, त्यांनी सोमय्यांचा रोख नेमका कोणत्या नेत्याकडे आहे, हे आपण कसे शोधणार, पक्षानेच ते शोधायला हवे, असे म्हटले.

Published on: Dec 11, 2025 11:50 AM