
चेहऱ्याचा गोल्डन रेशिओ मोजण्यासाठी चेहऱ्याची लांबी आणि रुंदी मोजली जाते, आणि नंतर लांबीला रुंदीनं भाग दिला जातो. तज्ज्ञांच्या मते, आदर्श परिणाम सुमारे 1.62 असावा. ( photos - social media/Instagram)


Zendaya - झेंडाया (94.37%) ही एक अभिनेत्री आणि गायिका आहे. तिला असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. दोन प्राइमटाइम एमी अवार्ड आणि एक गोल्डन ग्लोब अवार्डने तिला सन्मानित करण्यात आलं आहे.

Bella Hadid - इसाबेला खैर हदीद (94.35%) एक अमेरिकन मॉडल आहे. तिने आंतरराष्ट्रीय वोग कव्हरवर 35 वेळा उपस्थिती दाखवली आहे.

Beyonce -बियॉन्से - (92.44%) एक अमेरिकन गायिका, गीतकार, अभिनेत्री आणि बिझनेस वूमन आहे. ती आतापर्यंतच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या संगीत कलाकारांपैकी एक आहे, अंदाजित विक्री 200 दशलक्षांहून (मिलियनहून) अधिक आहे.

Ariana Grande - अरियाना ग्रँड (91.81%) एक अमेरिकन गायिका, गीतकार आणि अभिनेत्री आहे. ग्रँडला तिच्या चार-ऑक्टेव व्होकल रेंजसाठी ओळखलं जातं.

Deepika Padukone - भारतीय अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या संदीप रेड्डी वांगा यांच्या स्पिरिट या सिनेमामुळे चर्चेत आहे. दीपिकाला तिच्या गैरव्यवसायिक वर्तन आणि मागण्यांमुळे प्रभास अभिनीत 'स्पिरिट' या चित्रपटातून बाहेर करण्यात आलं आहे आणि तिच्या जागी तृप्ती डिमरीची निवड करण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र दीर्घ काळ काम करावं लागणं आणि संदीपच्या वागणुकीमुळे हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं दीपिकाचं म्हणणं आहे.