High BP: हाय ब्लड प्रेशरमुळे त्रस्त असाल तर दररोज प्या ‘हे’ ज्यूस

| Updated on: Oct 27, 2022 | 3:59 PM

तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. काही ज्यूसचे सेवन केल्यास तुम्हाला ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत होईल.

1 / 5
ब्लड प्रेशर हा एक असा आजार आहे ज्यामुळे ब्रेन हॅमरेजसुद्धा होऊ शकते. हाय ब्लड प्रेशरला हायपर टेन्शनही म्हटले जाते. जेव्हा रक्त पंप करण्यात हृदयाला अधिक प्रमाणात जोर लावावा लागतो तेव्हा हाय ब्लड प्रेशरचा त्रास होतो. आज आम्ही तुम्हाला काही अशा ज्यूसबद्दल माहिती सांगणर आहोत, ज्यांचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.

2 / 5
कारल्यामध्ये अँटी-ऑक्सीडेंट असतात जे शरीराचे अनेक आजारांपासून संरक्षण करतात. त्यामध्ये व्हिटॅमिन-ए आणि सी असते जे ब्लड प्रेशर आण रक्तातील साखर, हे दोन्ही नियंत्रणात ठेवते.

3 / 5
टोमॅटो हा प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरात आढळतो. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि के यासह फॉस्फरस, कॉपर, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम यांसारखी अनेक पोषक तत्वं असतात. तसेच टोमॅटोमध्ये ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्याची क्षमता असते.

4 / 5
पालक हा आपल्या शरीरासाठी अतिशय उपयोगी असतो. त्यामध्ये पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असते, जे आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरते. पोटॅशिअम मुळे रक्ताभिसरण चांगले होते. जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होत असेल तर पालकाचा ज्यूस सेवन केल्याने फायदा मिळेल.

5 / 5
बीट हे अतिशय आरोग्यदायी असते. त्यामध्ये सोडिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस यासारखी पौष्टिक तत्वं मुबलक प्रमाणात असतात जी ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतात. बीटामध्ये नायट्रेटही असते, जे शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करते