AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs DC Toss : दिल्लीकडे शेवटची संधी, पंजाब विरुद्ध एकूण 5 बदल, कुणाचा समावेश?

Punjab Kings vs Delhi Capitals Toss and Playing 11 : दिल्ली कॅपिट्ल्स आणि पंजाब किंग्स दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. जाणून घ्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण कोण आहेत.

PBKS vs DC Toss : दिल्लीकडे शेवटची संधी, पंजाब विरुद्ध एकूण 5 बदल, कुणाचा समावेश?
PBKS vs DC TossImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 11, 2026 | 8:04 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 55 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने आहेत. पंजाबचा हा 11 वा आणि दिल्लीचा 12 वा सामना आहे. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.  अक्षर पटेल दिल्लीचं तर श्रेयस अय्यर पंजाबचं नेतृत्व करणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. दिल्लीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन अक्षरने पंजाब विरुद्ध चेजिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीचे गोलंदाज पंजाबला किती धावांवर रोखण्यात यशस्वी ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्लेइंग ईलेव्हन अपडेट

पंजाब किंग्सने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. बेन ड्वारशुइस याचा लॉकी फर्ग्यूसन याच्या जागी समावेश करण्यात आला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकूण 5 बदल करण्यात आले आहेत. दिल्लीच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये अभिषेक पोरेल, साहिल पारख, डेव्हिड मिलर, आकिब नबी दार आणि माधव तिवारी या 5 जणांना संधी देण्यात आली आहे.

दिल्लीसाठी शेवटची संधी, पंजाब जिंकणार?

आयपीएल 2026 स्पर्धेतून आतापर्यंत एकूण 2 संघ बाहेर झाले आहेत. लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टातं आलं आहे. त्यानंतर आता दिल्ली कॅपिट्ल्सवर स्पर्धेतून बाहेर होण्याची टांगती तलवार आहे. दिल्लीला प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी पंजाब विरुद्ध कोणत्याही स्थितीत जिंकावं लागेल. तर पंजाबने हा सामना जिंकल्यास त्यांना प्लेऑफमधील पोहचण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे दिल्ली आणि पंजाब दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

दोन्ही संघांची स्थिती

दरम्यान पंजाब पॉइंट्स टेबलमधील ताज्या आकडेवारीनुसार चौथ्या स्थानी आहे. पंजाबने 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तसेच पंजाबचा 1 सामना हा पावसामुळे वाया गेला. पंजाबच्या खात्यात एकूण 13 गुण आहेत. तर दिल्लीला 11 पैकी फक्त 4 सामनेच जिंकता आले आहेत. तर दिल्लीचा 7 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. दिल्ली 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : अक्षर पटेल (कर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), अभिषेक पोरेल, साहिल पारख, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हीड मिलर, माधव तिवारी, मुकेश कुमार, आकिब नबी दार, मिचेल स्टार्क आणि लुंगी एन्गिडी.

पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कॅप्टन), सूर्यांश शेडगे, मार्कस स्टॉयनिस, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, बेन ड्वारशुइस, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

Follow Us
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे