AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today: कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या, पेट्रोल आणि डिझेलचे दर काय? वाचा…

Petrol Diesel Price Today: गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमती वाढत असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत होत्या. पण काल कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे आज पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत? वाचा...

Petrol Diesel Price Today: कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या, पेट्रोल आणि डिझेलचे दर काय? वाचा...
petrol-dieselImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 24, 2026 | 10:13 AM
Share

पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याचे संकेत देत आहेत. मात्र सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्याची कोणतीही शक्यता नाही. आज २४ सप्टेंबर २०२६ रोजी देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कालसारख्याच आहेत. यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत पेट्रोलची किंमत १०२.१२ रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत ९५.२० रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किंमती अनुक्रमे १११.२१ रुपये आणि ९७.८३ रुपये प्रति लिटर आहेत.

आज कच्च्या तेलाची किंमत

बुधवारी झालेल्या जोरदार वाढीनंतर आज २४ सप्टेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत किंचित घट दिसत आहे. मात्र, ती अजूनही १०० डॉलर प्रति बॅरलच्या मानसिक पातळीच्या वरच आहे. आज सुमारे १.१८% ची किंचित घट होऊन ब्रेंट क्रूड १०२.१८ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. काल बुधवारी हे सुमारे ४% वाढून १०३.०८ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले होते. त्याचप्रमाणे अमेरिकन क्रूड ऑइल सध्या ९१.६८ डॉलर ते ९२.०० डॉलर प्रति बॅरलच्या दरम्यान व्यवहार करत आहे.

शहर पेट्रोलची किंमत (प्रति लिटर) डिझेलची किंमत (प्रति लिटर)
दिल्ली १०२.१२ रुपये ९५.२० रुपये
मुंबई १११.३१ रुपये ९७.९७ रुपये
फरीदाबाद १०३.२८ रुपये ९६.१० रुपये
चेन्नई १०७.७८ रुपये ९९.५६ रुपये
लखनौ १०१.८६ रुपये ९५.३६ रुपये
पटना ११३.३५ रुपये ९९.३६ रुपये
नासिक ११२.४६ रुपये ९८.२० रुपये
भोपाल ११५.४१ रुपये १००.४७ रुपये
अहमदाबाद १०२.५८ रुपये ९८.७० रुपये

पेट्रोल-डिझेलचे भाव वाढतील का?

पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असल्या तरी सरकारी सूत्रांनी पुष्टी केली आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सध्या वाढ करण्याची कोणतीही योजना नाही. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतारांची शक्यता लक्षात घेऊन सरकार एनर्जी सिक्युरिटीला प्राधान्य देत आहे. याअंतर्गत तेल मार्केटिंग कंपन्यांना सबसिडी दिली जाऊ शकते, जेणेकरून त्या किंमतींचा दबाव स्वतः झेलू शकतील, त्यांचा नफा मार्जिन कायम राहील आणि सामान्य जनतेला जागतिक पातळीवरील किंमतीतील वाढीच्या परिणामापासून वाचवता येईल.

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे पुरवठ्यात येणाऱ्या अडथळ्यांना तोंड देण्यासाठी सरकारने सातत्याने कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवली आहे. इराक आणि सौदी अरेबियाकडूनही तेल खरेदीची योजना आखली जात आहे. सध्या तेल मार्केटिंग कंपन्यांना डिझेलवर प्रति लिटर २० ते २५ रुपये आणि पेट्रोलवर प्रति लिटर ५ ते १० रुपये नुकसान (अंडर-रिकव्हरी) होत आहे.

Follow Us
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट..
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट कारवाई
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास...
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास बंदी; मोठं कारण समोर?