
रतनागिरी- समुद्रात कधी काय होईल हे सांगता येत नाही. घडीत समुद्र खवळतो तर कधी हाच समुद्र अगदी शांत भासतो. सध्या कोकणातील समुद्राने मात्र रौद्र रुप धारण केले आहे.

कोकणातील समुद्राला आज पाचव्या दिवशी मोठं उधाण आलं आहे. या भागात समुद्र चांगलाच खवळला आहे. खवळलेल्या समुद्रामुळे किनारपट्टी भागात अजस्त्र लाटांचे तांडव पाहायला मिळत आहे.

लाटा आणि सोसाट्याचा वाऱ्यामुळे किनारपट्टी भागात दाणादाण उडाली आहे. ही स्थिती लक्षात घेता किनारपट्टी भागात राहणार्या लोकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या कोणातील किनारपट्टी भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र मागच्या पाच दिवसांपासू या भागात समुद्रातून अजस्त्र लाटा येत आहेत. समुद्राचे हे खवळलेले रुप धडकी भरवणारे आहे.

रत्नागिरीच्या भगवती जेटीवरून सध्या समुद्राच्या लाटा पलिकडे जात आहेत. समुद्राच्या रुद्र रुपाचे हे तांडव रत्नागिरी, राजापूर, दापोली आणि गुहागर किनाऱ्य़ावर पाहायला मिळत आहे. किनारपट्टी भागात सध्या साडेपाच मीटरहून अधिक उंचीच्या लाटा येत आहेत.