
‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’, ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’, अशा अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर आपल्या क्यूटनेस आणि हॉटनेसचा जलवा दाखवतेय.

नवनवीन फोटोशूट शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करते. नेहमी ट्रेंडी लूकमध्ये ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होते.

नुकतंच पार पडलेल्या लॅक्मे फॅशन विकमध्ये हीनानं रँप वॉकवर आपला जलवा दाखवला.

मनीष मल्होत्राच्या खास लेहेंग्यामध्ये आता हीनानं खास फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या लेहेंग्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

'ये रिश्ता क्या कहलाता हैं' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमधून हीना घराघरात पोहोचली. 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेत तिनं अक्षराची भूमिका साकारली आणि संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.