न्यूजपेपरचं कात्रण अन् त्यात लपलेला मृत्यू; 8 एपिसोड्सची थ्रिलर सीरिज पाहून बसेल धडकी

जर तुम्हाला थ्रिलर, सस्पेन्स आणि हॉररने भरलेल्या कथा आवडत असतील, तर ही वेब सीरिज तुमच्या 'मस्ट वॉच' यादीत समाविष्ट करून घ्या. आठ एपिसोड्सच्या या सीरिजचा आयएमडीबीवरही चांगली रेटिंग मिळाली आहे.

| Updated on: Aug 17, 2026 | 3:31 PM
1 / 5
ओटीटीवर एकापेक्षा एक दमदार सस्पेन्स आणि क्राइम थ्रिलर सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. यातील ट्विस्ट अक्षरश: हादरवून सोडणारे असतात. अशीच एक वेब सीरिज ओटीटीवर चांगलीच गाजतेय. यात सस्पेन्ससोबतच हॉरर आणि भविष्यात घडणाऱ्या घटनांचाही ट्विस्ट आहे. या सीरिजच्या कथेत काही ट्विस्ट असे येतात, जे पाहून डोकं चक्रावून जातं.

2 / 5
वर्तमानपत्रातील कात्रणातून तुम्हाला भविष्याबद्दल समजू लागलं, तर काय होईल? याचा कधी विचार केला का? उद्या काय होणार आहे, कोणाचा मृत्यू होणार आहे, असं या कात्रणातून समजलं, तर तुम्ही काय कराल? भविष्यातील घटना तुम्ही थांबवू शकाल का? हेच प्रश्न या सीरिजमध्ये उपस्थित करण्यात आले आहेत. त्यात त्याची उत्तरंही मिळतात आणि कथेनं तुमच्या अंगावर काटा येतो.

3 / 5
या वेब सीरिजचं नाव 'धूता' असं आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या या हॉरर थ्रिलर सीरिजमध्ये नाग चैतन्य, प्राची देसाई, प्रिया भवानी शंकर, पार्वती, रविंद्र विजय आणि कामाक्षी भास्कर यांच्यासह इतरही कलाकारांच्या भूमिका आहेत. या सीरिजचा सर्वांत भयानक पैलू म्हणजे, दररोज एका वर्तमानपत्राच्या स्तंभात कोणाबद्दल तरी वाईट बातमी प्रसिद्ध होते. ज्या व्यक्तीची बातमी प्रसिद्ध होते, तिचा मृत्यू होतो.

4 / 5
यामुळे जवळपास 80 लोकांचा बळी गेला आहे. काही जण आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात, तर काहींचा अपघातात मृत्यू होतो. 'धूता' ही सागर वर्मा नावाच्या एका महत्त्वाकांक्षी संपादकाची कथा आहे. जेव्हा रहस्यमयी वर्तमानपत्रातील कात्रणं त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या मृत्यूंचं अचूक भाकीत करू लागतात, तेव्हा त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं.

5 / 5
'धूता' ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्ये उपलब्ध आहे. आयएमडीबीवर या सीरिजला दहापैकी 7.7 रेटिंग मिळाली आहे. या सीरिजचं दिग्दर्शन विक्रम के. कुमार यांनी केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us