सकाळी कोमट पाण्यात चिमूटभर हिंग मिसळून प्या; एक नाही अनेक फायदे, जाणून घ्या..

हिंग हा केवळ पदार्थांचा सुगंध आणि चव वाढवण्यासाठी वापरला जाणारा एक मसाला नाही, तर ते एक आयुर्वेदिक औषधसुद्धा आहे. दररोज सकाळी कोमट पाण्यात चिमूटभर हिंग मिसळून प्यायल्याने आपल्या शरीराला आश्चर्यकारक आरोग्य फायदे मिळू शकतात. चला आता ते फायदे नेमके काय आहेत, हे सविस्तरपणे जाणून घेऊया.

| Updated on: Oct 29, 2026 | 3:34 PM
1 / 5
 पचन सुधारते आणि गॅसच्या समस्यांवर नियंत्रण ठेवते: सकाळी हिंगाचे पाणी प्यायल्याने पाचक रसांना चालना मिळते. यामुळे पोटात गॅस तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि खाल्लेल्या अन्नाचे पचन सहज होण्यास मदत होते. विशेषतः ज्यांना पोट फुगणे, अपचन आणि आम्लपित्ताचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हा एक रामबाण उपाय म्हणून काम करतो.

पचन सुधारते आणि गॅसच्या समस्यांवर नियंत्रण ठेवते: सकाळी हिंगाचे पाणी प्यायल्याने पाचक रसांना चालना मिळते. यामुळे पोटात गॅस तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि खाल्लेल्या अन्नाचे पचन सहज होण्यास मदत होते. विशेषतः ज्यांना पोट फुगणे, अपचन आणि आम्लपित्ताचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हा एक रामबाण उपाय म्हणून काम करतो.

2 / 5

वजन नियंत्रणात मदत करते: शतावरीचे पाणी शरीरात साठलेली चरबी जाळण्यास आणि चयापचयाची गती वाढविण्यात मदत करते. सकाळी हे पेय प्यायल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थ सहजपणे बाहेर टाकले जातात. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांना यामुळे चांगले परिणाम मिळतात.

3 / 5

रोगप्रतिकारशक्ती वाढवते: शतावरीमध्ये जीवाणूनाशक, विषाणूनाशक आणि दाहशामक गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. हे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि हंगामी आजार व विविध संसर्गांपासून तिचे संरक्षण करतात.

4 / 5

रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण: काही अभ्यासांनुसार, हिंगाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने टाईप-२ मधुमेहाच्या रुग्णांमधील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यासही मदत होते.

5 / 5

घ्यावयाची खबरदारी: हिंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर असले तरी, त्याचे अतिसेवन करू नये. गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हिंगाचे सेवन करू नये. ज्यांना काही आरोग्य समस्या आहेत, त्यांनी तज्ञांच्या देखरेखीखालीच त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करणे उत्तम.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us