मी थायलंडला गेले अन् त्यानं…मराठी अभिनेत्रीची फसवणूक, सांगितला धक्कादायक प्रकार
Hemal Ingle : लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची फसवणूक झाली असून त्याबद्दल तिनं सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं आहे.

आजकाल सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांसोबत फसवणुकीचे प्रकार पाहायला मिळतात. याबद्दल कलाकार सोशल मीडियावर जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांचे अनुभवही शेअर करतात. अशातच आता मराठी अभिनेत्री हेमल इंगळेसोबत एका धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याबद्दल तिनं सोशल मीडियावर माहिती देत घडलेला प्रकार सांगितला आहे.
हेमल इंगळेची पोस्ट
हेमल इंगळे म्हणाली की, ‘माझ्यासोबत कदाचित एक स्कॅम झाला आहे. एक ऑक्टोबर रोजी मी जोगेश्वरी फर्निचर मार्केटमधून एक बेड खरेदी केला. त्याचे ऍडव्हान्स पैसे मी दिले होते. त्यानंतर मी थायलंडला गेले. त्यानं पितृपक्ष संपल्यावर साधारण दहा तारखेपर्यंत बेड डिलिव्हर करायचा असं ठरलेलं. मी माझ्या आईला त्या संदर्भातले सगळे रिसीट वगैरे देऊन गेलेले. मी आल्यावर सुद्धा तो बेड आला नव्हता, त्यामुळे मी त्या माणसाला फोन केला. तो फोनवर मी दोन दिवसांनी देतो, तीन दिवसांनी देतो, असं पुढे ढकलत राहिला आणि एक आठवडा काढला. मग मी कंटाळून त्याला फोन केला आणि म्हटलं की काय चालू आहे तुझं? तर तो मला म्हणाला की मॅडम माझं गोडाऊन जळालं.’
‘मी त्याच्यावर विश्वास ठेवला. कदाचित तो खोटं बोलत नसावा असं वाटलं. मी त्याला पुन्हा विचारलं की, माझा बेड कधी देणार ? यावर तो दोन दिवसांनी देणार असं म्हणाला. तीन दिवसांनी मी फोन केला तेव्हा त्याने माझा फोन उचललाच नाही. त्याने माझा फोन कट केला आणि मेसेज पाठवला की, मी हॉस्पिटलमध्ये आहे, त्यामुळे तुमचा फोन आता उचलू शकत नाही. एक तर त्याचा दिवसभर फोन स्विच ऑफ असतो. संध्याकाळी मला त्याचा फोन ऑन झाला चा मेसेज आला म्हणून मी त्याला फोन केला. फोन केल्यावर तो मला काही ना काही तरी कारण देत होता. असं परत करत आता त्याने 28 दिवस काढले आहेत. अजूनही माझा बेड आलेला नाही.’
View this post on Instagram
‘आता जो माझ्याकडे बेड आहे तो माझ्या ओनरचा बेड आहे. मी एका मॅट्रेस बेडसोबत कोलॅबोरेट केलं होतं. त्यामुळे ती मॅट्रेस सुद्धा माझ्याकडे येऊन पडली आहे. पण, बेडच नाही तर आता मी काय करायला हवं? शिवाय मध्ये जेव्हा मी पंधरा-वीस दिवसांपूर्वी त्याला फोन केलेला तेव्हा तो मला म्हणाला, माझं गोडाऊन जळालं, त्यात माझा खूप नुकसान झालं. तुम्ही मला माझे उरलेले पैसेसुद्धा पूर्ण द्या मग मी तुम्हाला तुमचा बेड नीट पूर्ण करून देतो. तर मी ते सुद्धा त्याला पैसे पूर्ण देऊन टाकले. मी नॉर्मली कधीच असा मूर्खपणा करत नाही. पण यावेळी मी ते केलं, मी त्याला पोलिसांची ही धमकी दिली. मी त्याला पोलिसांकडून सुद्धा फोन लावला पण त्यांना सुद्धा तो त्याच थापा देतो. मी हॉस्पिटलमध्ये आहे वगैरे सांगतो, माझा सगळं सामान जळालं आहे. मला आता कळत नाहीये की या माणसासोबत मी काय करावं?’ असं अभिनेत्री शेवटी म्हणाली.
